गंगापूर पोलिसांनी शहरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.


गंगापूर (प्रतिनिधी) गावठी कट्टासह दोन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत गुन्हेगाराला गंगापुर पोलीसांनी शिताफिने केले जेरबंद.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, गंगापुर ते वैजापूर जाणारे महामार्गावरती असलेल्या हॉटेल अन्नपुर्णा समोर एक व्यक्ती हा दारुच्या नशेत तर्रट असून त्यांची हालचाल ही संशयास्पद आहे. तसेच त्याचे कमरेला गावठी कट्टा त्यांने लावलेला आहे.या माहितीच्या आधारे पो. नि. सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकांने १ एप्रिल रोजी तात्काळ हॉटेलच्या दिशेने धाव घेवुन हॉटेलच्या परिसरात येताच हॉटेलच्या बाहेर एक ईसम हा संपूर्ण पणे दारुच्या अंमलाखाली गोंधळ घालतांना नजरेस पडला. त्याची हालचाल हि संशयास्पद दिसुन आल्याने पोलीसांनी त्याच्या दिशेने थाव घेवुन त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्या तोंडाचा उग्रवास येत असल्याने त्यांने अति दारूचे सेवन केलेली होती. त्याला पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने अडखळत त्याचे नाव कानिफनाथ माणिक मावस ३८ वर्ष रा. भिवधानोरा ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर असे सांगितले यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक स्टिलच्या धातूचा काळया रंगाचा गावठी कट्टा (पिस्टल) व दोन जिवंत काडतुस (राऊंड) अवैधरित्या विनापरवाना जवळ वाळगतांना मिळुन आला आहे. गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस असे एकुण हजार ३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मावस यांच्या विरूध्द गंगापुर पोलिस स्टेशनमध्ये कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्या व कलम ८५ (१) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगापुर पोलीस करित आहेत. कानिफनाथ मावस हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर जिल्हयात भादंवी कलम ३०२ अन्वये सारखा गंभीर गुन्हा दाखल असून त्याचप्रमाणे अवैधरित्या दारू विक्री करणे, जुगार यासारखे सुध्दा गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक केदारनाथ पालवे, पो.उप.नि. पोलीस सुभाष झोरे,अंमलदार अमोल कांबळे, दिनकर थोरे, अभिजीत डहाळे, तेन्सिग राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!