बापाच्या नात्याला काळीमा फासणारी वाळुज परिसरातील घटना… अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडूनच अत्याचार, मुलगी झाली गर्भवती,बापाला अटक.

बापाच्या नात्याला काळीमा फासणारी वाळुज परिसरातील घटनाअल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडूनच अत्याचार, मुलगी झाली गर्भवती,बापाला अटक
वाळूज /प्रतिनिधी.
आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवरच नराधम बापाने अत्याचार केल्याने गर्भवती राहिली. नात्याला काळीमा फासणारी घटना वाळूज पोलीस ठाणे हद्दीत सोमवार ३१ जुलै रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित बालिकेचे आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र पोलिसांच्या तपासांती हे कृत्य नराधम सावत्र बापानेच केल्याचे उघडकीस आल्यानंतर सावत्र बापास वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बालिकेच्या आईचा सुमारे तीन वर्षापूर्वी घटस्फोट झालेला आहे. त्यामुळे घटस्फोटीत महिलेच्या वडिलांनी गावातच तिचे दुसरे लग्न करून दिले होते. पीडित मुलगी ही आजोबाकडेच राहते .तसेच अधून मधून ती आपल्या सावत्र बापाच्या घरी जात असत. रविवार ३० जुलै रोजी फिर्यादीचा जावई याने फोनवरून माहिती दिली की तुमच्या नातीला झटके येत असून ती हात पाय वाकडे करीत आहे. यावेळी तिला आजोबा व मामांनी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचार केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला घाटी दवाखाना येथे हलवण्यास सांगितले. घाटी दवाखान्यात दाखल केल्यानंतर तेथे वैद्यकीय उपचार करत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीडित मुलगी ही पाच महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकताच अजोबा सह नातेवाईकांना मोठा धक्काच बसला. यावेळी तिच्या आजोबांनी पीडीतेच्या आईस याबाबत विचारणा केली .मात्र तिनेही अनभिज्ञता व्यक्त केली.यावेळी त्यांनी पीडित मुलीस विचारपूस केली असता तिने कोणतेही उत्तर दिले नाही. दरम्यान तिची प्रकृती नाजूक झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची प्रसवपूर्व प्रसूती केली. यावेळी बाळाचे वजन कमी असल्याने बाळावर घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित बालकेच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात अत्याचार व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी अधिक तपास केला असता, तिच्या सावत्र बापानेच हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे .त्यावरून वाळूज पोलिसांनी नराधाम सावत्र बापास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनीषा केदार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!