महाराष्ट्रात प्रथमच गंगापूर तालुक्यात सॅटॅलाइटद्वारे सिटीसर्व्हेला नवाबपुरवाडी येथुन सुरुवात….. लवकरच पि आर कार्ड मिळणार..

महाराष्ट्रात प्रथमच गंगापूर तालुक्यात सॅटॅलाइटद्वारे सिटीसर्व्हेला नवाबपुरवाडी येथुन सुरुवात

लवकरच पि आर कार्ड मिळणार


गंगापूर (प्रतिनिधी)महाराष्ट्रात प्रथमच गंगापूर तालुक्यात सॅटॅलाइटद्वारे सिटीसर्व्हेला नवाबपुरवाडी येथुन सुरुवात करण्यात आली असून एका दिवसात ३०० घराचा सर्व्हे करून लवकरच पि आर कार्ड वितरित करण्यात येणार आहे.
बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता अचूकता येत असून कमी वेळ व श्रमात अधिक अचूक काम होऊ लागले आहे. ग्रामीण भागात भूमापन हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला असून आता भूमापनासाठी सॅटॅलाइटचा वापर होऊ लागल्याने अनेक समीकरणे बदलून जातील अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. बुधवार २ ऑगस्ट रोजी गंगापूर तालुक्यातील नवाबपुरवाडी येथे सॅटॅलाइटद्वारे सर्वेक्षणाच्या अभियानाचा प्रारंभ पुणे येथील जमाबंदी आयुक्त व संचालक भुमीअभिलेख महाराष्ट्र राज्य एन के सुधांशू यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच नंदकुमार सजगुरे,माजी उपसंचालक भूमि अभिलेख जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे बाळासाहेब काळे,जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख परभणी येथील वसंत निकम , वैजापूर उप अधीक्षक भूमि अभिलेख सुनील मोरे, गंगापूर उप अधीक्षक भूमि अभिलेख सुभाष दत्तू इपाळ , निदेशक प्रशिक्षण प्रबोधनी औरंगाबाद पवार, सर्वेश्वर, कुलकर्णी, महेंद्र गारजकर, वि टी कांबळे, मुख्यालय सहाय्यक आप्पासाहेब टोम्पे, शिरसतेदार,ग्रामविकास अधिकारी गायकवाड, सुषमा राजेंद्र जाधव, साधना लोखंडे, नवनाथ बटोळे, गायकवाड दीपक पन्हाळा, अनिल देवकर,सानप श्रीकांत निंबोकार,
आदी उपस्थित होते. दिवसभरात गावातील २९५ घरांचा सर्व्हे करण्यात आला. महाराष्ट्रात विस एजन्सी मार्फत प्रत्येक गावांचा सिटी सर्व्हे करणार असल्याचे सुंधाशु यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले या सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचुकता येणार असून प्रत्येक धारकाच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या माध्यमातून सीमा निश्चित होतील, त्याचा फायदा वैयक्तिक धारकासह
गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हेची वैशिष्ट्ये प्रत्येक धारकांच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या निमित्तानं सीमा निश्चित होतील आणि मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल.प्रत्येक धारकाला मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका आणि सनद मिळेल.गावठाणातील जागेच्या मिळकत पत्रिकेत शेतीच्या 7/12 प्रमाणेच धारकाच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्या मान्यता मिळणार आहे.मिळकत पत्रिके आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होईल, तारण करता येईल, जामिनीचा मालक म्हणून राहता येईल, विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारी मिळकत पत्रिका उपलब्ध होणार आहे. सीमा माहिती असल्यामुळे धारकांना आपल्या मिळकतींचे संरक्षण करता येईल.गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्कांबाबत व हद्दींबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यास गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल. योजनेमुळे ग्रामपंचायतींना होणारे फायदे गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होईल.ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. ग्रामपंचायत हददीतील मालमत्ता मालमत्ताकराच्या व्याप्तीत येतील, त्यामुळे ग्रामपंचायत महसुलातवाढ ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारणपत्रक (नमुना नोंदवही) आपोआप, स्वयंचलनाने तयार होईल. हस्तांतरणाच्या नोंदी अद्ययावत करणे सहज, पारदर्शक आणि सुलभ होईल. गावठाणाच्या हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत, शासनाच्या मिळकती आणि सार्वजनिक मिळकती, जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सीमा आणि क्षेत्र निश्चित होतील. ते जनतेस माहितीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे गावठाणातील मिळकतींचे हद्दी व क्षेत्राचे वाद कमी होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!