आमदार प्रशांत बंब यांनी मतदार संघातील दिड हजार नागरिकांना स्वतंत्र रेल्वेने बौद्धगया येथे दर्शनासाठी पाठविले

आमदार प्रशांत बंब यांनी मतदार संघातील दिड हजार नागरिकांना स्वतंत्र रेल्वेने बौद्धगया येथे दर्शनासाठी पाठविले

गंगापूर (प्रतिनिधी)आमदार प्रशांत बंब यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी गंगापूर खुलताबाद यांच्या वतीने लासुर स्टेशन येथून दिड हजार बौद्धउपासकांच्या स्वतंत्र रेल्वेला आमदार प्रशांत बंब यांनी हिरवा झेंडा दाखवून बौद्धगयेला रवाना केले.
सर्व सुखसुविधांनियुक्त अशा या यात्रेचे आयोजन मागील तीन महिन्यापासून आमदार बंब व त्यांची टीम करत आहे. लासुर वरून ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता निघालेली ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर मार्गे अकोला ,जबलपूर, सतना ,इटारसी, प्रयागराज, वाराणसी व गया या मार्गे ही रेल्वे ११ सप्टेंबरला रात्री तीन वाजता गया येथे पोहोचणार आहे.

गया येथे पंधराशे लोकांसाठी साधारण स्वतंत्र रूम बुक करून यात्रेकरूंनंची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवसाच्या रेल्वे प्रवासादरम्यान दोन वेळेचे जेवण व चहा नाष्ट्याची व्यवस्था आयोजकाच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच मनोरंजनासाठी भीम गीते व बौद्ध उपासक गीते गायनासाठी गायक मंडळी तैनात ठेवण्यात आली आहे..
या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक सकाळपासूनच आतुरतेने रेल्वेची वाट पाहत होते आज लासुर स्टेशन येथे या सर्व उपासकांचा मेळावा घेत आमदार बंब यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आहे..

यावेळी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिकांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार संघातील आमदार प्रशांत भाऊ बंब मित्र मंडळाचे कार्यकर्ते व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!