आमदार प्रशांत बंब मित्रमंडळाने लासूर स्टेशनला बसवला अश्वारुढ छत्रपती शिवरायांच्या पुतळा


गंगापूर (प्रतिनिधी) लासुरस्टेशन येथे अश्वारुढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे
बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव, सरपंच मीनाताई संजय पांडव यांच्या शुभहस्ते जल्लोषात झाले पूजन .

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून मोठी व प्रशस्त जागा असूनही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभा पुतळा अज्ञात शिवप्रेमीनी काही वर्षांपूर्वी बसवला होता मात्र त्या पुतळ्याच्या तलवारीला क्षती पोहचली होती म्हणुन आमदार प्रशांत बंब यांनी त्यांच्या मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुतळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेवरून आमदार प्रशांत बंब मित्र मंडळाने येथील स्मारकात छत्रपती शिवरायांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा बसवला लासूर स्टेशन ही गंगापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारुद्ध पुतळा असावा अशी मागणी व इच्छा शिवप्रेमीतूनही होत होती मात्र आज मंगळवारी मध्यरात्री आश्वारुद्ध पुतळा बसवल्याने शिवप्रेमीत आनंदाचे वातावरण आहे.
२३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शेषराव नाना जाधव, सरपंच मीनाताई पांडव यांच्या शुभहस्ते या शिवस्मारकाचे पूजन करण्यात आले यावेळी नेता सुभाषचंद्र बोस, स्व.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपाचे जिल्हाअध्यक्ष अमोल पाटील जाधव,तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील चव्हाण, ग्रामविकासधिकारी ज्ञानेश्वर मुकणे,माजी सरपंच सुखदेव वाकळे,ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे,गणेश व्यवहारे,अशोक सौदागर, कल्याण पवार, राजाभाऊ गायकवाड,सोपान बोरकर,बाजार समितीचे संचालक सुनील पाखरे,सुरेश जाधव,विलास सोनवणे,भाऊसाहेब चिंधे,वाल्मिक पाटील चव्हाण, बाबासाहेब सोमासे,राजेश चव्हाण,अनिल बबलू पाटील पोळ,संतोष पाटील जाधव,संजय कापसे पाटील,गौतम नाहटा, दुर्गेश जैस्वाल,सचिन पांडे,शरद पाटील गायके,वैभव दसे,आदिसह शिवप्रेमीची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!