गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील प्रतिष्ठित नागरिक जगन्नाथ कन्हैयालाल मुंदडा(७३) यांचे १० फेब्रुवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, तिन मुली,सुना नातवंडे असा परिवार असुन ते गंगापूर साखर कारखान्याचे माजी संचालक
रामेश्वर कन्हैयालाल मुंदडा यांचे मोठे बंधू , महेश मुंदडा यांचे वडील व माजी सभापती सुमित मुंदडा यांचे काकातर रामेश्वर नावंदर यांचे सासरे होत. त्यांच्या पार्थिवावर जुने कायगाव येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.