भागाठाण येथे डोक्यात लाकडी दांडा मारून एकाच खून……… अनैतिक संबंधातून खुन झाल्याची चर्चा शिल्लेगाव पोलिसांची घटनास्थळी धाव.

गंगापूर(प्रतिनिधी)

गंगापूर तालुक्यातील भागाठाण येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास चाळीस वर्षीय इसमाचा डोक्यात लाकडाच्या दांड्याने मारून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून अनैतिक संबंधातून खुन झाला असल्याची चर्चा सुरू
राहुल नारायण चोरमल वय ४० रा.महाकांळ वाडगाव ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
दरम्यान शिल्लेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगाठाण शिवारात ऊसतोड कामगार वास्तव्यास आहेत या ऊसतोड कामगाराकडेच हा इसम मोटरसायकलने ऊसतोड कामगारांच्या झोपड्यावर आल्याचे समजते मात्र या ठिकाणी या इसमाचा डोक्यात लाकडाच्या दांड्याने मारून त्याचा खून करण्यात आला घटनेची माहिती मिळतात शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृत व्यक्तीच्या मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सिद्धनाथवाडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अद्याप पर्यंत खुनाचे कारण समजू शकले नाहीत मात्र शिल्लेगाव पोलीसांनी खुनाच्या दिशेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून लवकरच खुन्याच्या मुसक्या आवळणार असल्याचे शिल्लेगाव पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!