पडक्या विहिरीत पडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू . शवविच्छेदनानंतर दहन करण्यात आले.


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील मेहबूबखेडा येथील जुन्या पडक्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या पथकाने पंचनामा करून बिबट्याचे दहन करण्यात आले
गंगापूर तालुक्यातील मेहबूबखेडा येथील एका शेतात असलेल्या जुन्या पडक्या विहिरीत बिबट्याचा पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार ५ मार्च रोजी समोर आली आहे.वनविभागाच्या माहितीनुसार महबूबखेडा येथील शेतकरी श्रीराम नानासाहेब गाजरे यांच्या गट.नंबर.११४ मधील एका जुन्या पडक्या विहिरीमध्ये एक वन्यप्राणी बिबट पडलेला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर विभागाचे वनसंरक्ष.धुमाळ, छत्रपती संभाजीनगर च्या उपवनसंरक्षक आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर प्रा शंकर कवठे, वन परिमंडळ अधिकारी अनिल पाटील वनरक्षक.एन. आर.चाथे,एस.जी.शेळके व त्यांच्या पथकाने विहिरीत पडलेला मृत बिबट्यास बाहेर काढून पशुधन विकास अधिकारी.जी.डी.खताळ,एन.एल. गायकवाड,जे.डी. सावते यांच्यावतीने शवविच्छेदन करण्यात आले असून वन अधिकारी यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याची दहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!