जामगांव येथील २२ वर्षीय युवकाची वाहेगांव शिवारात व्हिडिओ काॅल करीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या.

गंगापुर(प्रतिनिधी) तालुक्यातील जामगाव येथील एका बावीस वर्षीय तरुणाने स्वतःच्या मोबाईल मध्ये स्टेटस ठेवून, व मित्रांना व्हिडिओ कॉल करून गळफास घेतला. सदरील घटना वाहेगाव येथे त्याच्या स्वतःच्या शेतामध्ये घडली.मिनीनाथ गिताराम रासकर (वय २२) रा. जामगाव.ता.गंगापुर असे मृत तरुणाचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीनानाथ रासकर हा जामगाव येथे आई-वडिलां बरोबर राहत होता. दोन दिवसापूर्वी त्याने हाताला ब्लेड मारून जखम करून घेतली होती ते स्टेटस त्यांनी त्याच्या व्हाट्सअप वर ठेवले होते.८ जानेवारी रोजी मिनानाथने जामगाव येथील एका दुकानांमधून दुपारी दोन वाजता बकरी बांधण्यासाठी दोरी विकत घेऊन गेला होता.त्या नंतर तो वाहेगाव येथील आजोबा भाऊसाहेब रासकर यांच्या गट क्रमांक २७७ मधील शेतातील बाभळीच्या झाडाला ८ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता फाशी घेतली. गळफास घेण्या अगोदर त्याने त्याच्या एका मित्राला व्हिडिओ कॉल करून सांगितले होते व त्याचे मित्र ज्यांनी व्हिडिओ कॉल बघितले ते जामगाव शिवारातील कारखान्याच्या शेतामध्ये त्याला शोधत होते मात्र तो काही सापडला नाही. मित्राने मीनानाथच्या मामाला फोन करून फाशी घेत असल्याचे सांगितले. त्यांनी जामगाव परिसरात बरीच शोधाशोध केली तो आढळून न आल्याने वाहेगाव येथील एकाला फोन करून बघण्यास सांगितले असता त्यांनी शेतात जाऊन बघितले तर तो बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले.नातेवाईकांनी त्वरित गंगापूर पोलीसांशी संपर्क साधून त्याला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संध्याकाळी डॉ प्रितीजा वेदपाठक यांनी शवविच्छेदन केले. रात्री उशिरा त्याच्यावर जामगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचे पक्षात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!