अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने एका मोटारसायकल स्वाराचा पडुन मृत्यू.


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर- औरंगाबाद मार्गावरील शहराच्या जवळ विराज हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २६ आक्टोंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश रावसाहेब पवार वय ३० वर्षे, रा. कोंडापूर, ता. गंगापूर हा शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवर क्रमांक एम एच २० डी क्यू ३०५३ वर बसून गंगापूरकडे येत असताना शहरापासून ३ किमी अंतरावर विराज हॉटेलच्या समोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला हूलकावणी दिली. त्यामुळे दुचाकीवरील गणेश पवार घसरून खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी याविषयी गंगापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. प्रशांत पंडुरे व रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेश यास येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!