मराठा व धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाच्या जामगाव ग्रामपंचायत सदस्या माधुरी संपत रोडगे यांनी सदस्य पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठविला.


गंगापूर (प्रतिनिधी) राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठा व धनगर आरक्षण प्रश्नाकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जामगाव ग्रामपंचायत सदस्या माधुरी रोडगे यांनी पदाचा राजीनामा मुख्यमंत्री यांना ईमेल केला आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे राजीनामा पत्र देण्यात आले दिलेल्या पत्रात म्हटले आहे की सध्या राज्यामध्ये मराठा व धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन उपोषण चालू असताना शासन – प्रशासन याकडे गांभीर्याने न घेता दुर्लक्ष करीत आहे ही प्रवृत्ती निषेधार्थ आहे. या सर्व प्रकारामुळे समाज बांधवांमध्ये प्रचंड प्रमाणात चीड निर्माण होत असून समाजाचे युवक आत्महत्या सारखा पर्याय अवलंबायला लागली आहे आरक्षणाच्या ज्वलंत मागणी विषयी सरकार गांभीर्य घेताना दिसत नाही शासनाने लवकरात लवकर समाजाला आरक्षण द्यावे ही माझी कळकळीची विनंती आहे दोन्ही समाजाविषयी असलेले नैतिकता म्हणून मी माझ्या जामगांव ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!