दया काळे मृत्यू प्रकरणी संजीवनी हाॅस्पिटलच्या संचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- आपचे मयुर दौंडकर

दया काळे मृत्यू प्रकरणी संजीवनी हाॅस्पिटलच्या संचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- आपचे मयुर दौंडकर
गंगापूर (प्रतिनिधी)दया काळेच्या मृत्युला कारणीभुत असलेल्या संजीवनी हाॅस्पिटलच्या संचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आपचे युवा प्रदेशाध्यक्ष मयुर दौंडकर यांनी केली आहे.
आपचे पदाधिकारी व पारधी समाजबांधवांनी ५ ऑगस्ट रोजी दया करुणा काळे पिंपळवाडी हीच्यावर संजीवनी हाॅस्पिटलच्या संचालक डॉ योगेश गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चुकीचा उपचार केल्यामुळे मृत्युमुखी पडली होती या प्रकरणी संबंधित डॉक्टर वरती गुन्हा दाखल न झाल्यामुळे आपचे पदाधिकारी व पारधी समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत मूक मोर्चा काढून पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व सपोनी भागवत नागरगोजे यांना निवेदन देऊन दोषी असलेल्या संजीवनी हॉस्पिटलचे संचालक योगेश गवळी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या निवेदनावर आपचे युवा प्रदेशाध्यक्ष मयुर दौंडकर, जिल्हा अध्यक्ष समीर लोखंडे, सैय्यद नेसरी, संघटनमंत्री सुग्रीव मुंढे,महीला शहराध्यक्षा ज्योती जाधव , गोपाल भड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!