धक्कादायक… नेवाशाचे तहसीलदार बिरादार यांच्यावर प्राणघातक हल्ला….रस्त्याच्या प्रकरणावरून जागा मालकाची मारहाण….

धक्कादायक..नेवाशाचे तहसीलदार बिरादार यांच्यावर प्राणघातक हल्ला….
रस्त्याच्या प्रकरणावरून जागा मालकाची मारहाण….

१ सप्टेंबर रोजी नेवासा फाटा बंद ठेवून नागरीक निषेध व्यक्त करणार*

नेवासा (प्रतिनिधी)नेवासा फाट्यावरील काॅलनीत जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठी आलेल्या तहसीलदार संजय बिरादार यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी तीन आरोपी विरोधात विविध कलमानुसार नेवासा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून १ सप्टेंबर रोजी नेवासा फाटा बंद ठेवून नागरीक निषेध व्यक्त करणार
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकिंदपुर परिसरातील नेवासा फाटा येथील तारापार्क, साईतेज कॉलनी, फाटके कॉम्प्लेक्स, शांतीनगर, येथे मराठी शाळेला येण्या-जाण्याचा रस्ता बंद केल्याने ३० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात मुकिंदपुर सरपंच सतिश दादा निपुंगे, किशोर गव्हाणे, जनार्दन औताडे, रावसाहेब तुपे, पंजाबराव चोरगुडे, दीपक पवार, पी.आर.जाधव, ज्ञानदेव गुंड, योगेश पांढरे, साहेबराव निपुंगे, गणेश शेजुळ, छबुराव काळे, संजय आगळे, दत्तात्रय औताडे, बाळासाहेब बोर्डे, दिगंबर पुंड, दत्तात्रय पुंड, ज्ञानेश्वर पुंड, प्रदीप राजगिरे, सचिन पठाडे, बाळासाहेब ठोंबरे, राहुल कडवे, अमोल धोत्रे, भास्कर लिहिणार, संभाजी पठाडे, डॉ.हरिष चावरे, राजेंद्र तुपे, ऋषभ साळवे, मंगेश गुंड आदींसह महीला व नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन चालू असताना नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार यांनी आंदोलन स्थळी जाऊन नागरिकांची सविस्तर माहिती घेऊन वहिवाट रस्ता ठिकाणी सर्व नागरिकांना नेऊन तहसीलदारांनी तेथे पंचनामा केला. मुकिंदपुर येथील गट नंबर ८०/३/अ मध्ये असलेला रस्ता मूळ मालकाने बंद केल्यामुळे येथील रहिवाशांची जाण्या-येण्याची गैरसोय होत आहे.असा नागरिकांचा अर्ज होता. त्या अनुषंगाने तहसीलदार नेवासा यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख नेवासा, गट विकास अधिकारी नेवासा यांच्या समवेत सदर गटाची पाहणी केली. या गटातून वहिवाट करत असलेल्या जागेवर मूल मालक घुले यांनी पत्र्याच्या शेडची उभारणी केल्याचे दिसून आले गट नंबर ८०/३/अ/लेआउट नकाशाची पाहणी केली असता सदर लेआउट मध्ये पोहोचण्यासाठी छत्रपती संभाजी नगर ते अहमदनगर महामार्गावरील जवळचा पंधरा मीटर रुंदीचा रस्ता असल्याचे लेआउट मध्ये नकाशावरून दिसून येतो. तो पंचनामा तलाठी आण्णा दिघे यांनी तहसीलदार संजय बिरादार, पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे व सर्व नागरिकांसमोर वाचून दाखवला. त्यानंतर तहसीलदारांनी जागा मालक घुले यांना रस्त्यावर टाकलेल्या टपऱ्या काढण्यासाठी सूचना दिल्या या कारणावरून तहसीलदार व जागा मालक घुले यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. तहसीलदारांच्या मारहाणीमुळे नेवासा फाटा परिसरात एकच खळबळ उडाली. नेवासा तहसीलदार संजय बिरादार यांना मारहाण करणाऱ्या जागा मालक करणसिंह घुले, ज्ञानेश्वर घुले, सत्यजित घुले यांच्या विरोधात नेवासा पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ३०७,३५३,३३२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहे.

तहसीलदार मारहाणीच्या निषेधार्थ एक सप्टेंबरला नेवासा फाटा बंद
नेवासा तहसीलदार संजय बिरादार साहेब यांच्यावर नेवासा फाटा मुकिंदपूर परिसरात आज जो हल्ला झाला तो नेवासा तालुक्यातील प्रशासनावर झालेला हल्ला आहे आणि तो निंदनीय तसेच घृणास्पद हल्ला आहे. तहसीलदारावर हल्ला केलेल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच तहसीलदारावर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ मुकिंदपुर परिसर, नेवासा फाटा परिसर शुक्रवार १ सप्टेंबर रोजी बंद पुकारण्यात येत आहे.

सतीश दादा निपुंगे.
सरपंच मुकिंदपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!