पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने देवगड येथे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजनसकाळी ८.३० ते ११.३० यावेळेत होणार भागवत कथा

पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने देवगड येथे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन
सकाळी ८.३० ते ११.३० यावेळेत होणार भागवत कथा

नेवासा(प्रतिनिधी)त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त पिठाचे प्रमुख व गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन रविवार दि.२३ जुलै ते रविवार दि.३० जुलै या कालावधीत करण्यात आले असून या सोहळयाची देवगड येथे जय्यत तयारी सुरू आहे.सकाळी ८.३० ते ११.३० यावेळेत भागवत कथा सोहळा होणार आहे.
श्री समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबा बालसंन्याशी यांच्या कृपा आशिर्वादाने त्रैवार्षिक पुरुषोत्तम मास निमित्ताने श्रीमद भागवत कथा तथा श्री दत्त लक्ष्मी नारायण याग या निमित्ताने होणार आहे.देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज हे भागवताचार्य असून उत्तराधिकारी पदी नियुक्त झाल्यानंतर त्यांनी जळके,गोगलगाव,टाकळीभान,नगर आदी ठिकाणी श्रीमद भागवत कथा झाल्या या कथांना भाविकांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता देवगड भक्त परिवाराच्या इच्छेनुसार गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी पुरुषोत्तम मासामध्ये सर्व भाविकांना कथा श्रवणाचा लाभ घेता यावा म्हणून स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळयाचे आयोजन केले आहे.
श्रीमद भागवत कथा सोहळयाच्या निमित्ताने पहाटे ३.३० ४.३० सनई वादन,४ ते ६ काकडा श्रींची प्रात:आरती सकाळी
७.३० ते ८.३० गीतापाठ,विष्णू सहस्त्रनाम,सकाळी ८.३० ते
११.३० श्रीमद भागवत कथा,दुपारी १२ ते ३ भोजन प्रसाद
दुपारी ४ ते ५ श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबा अभंगावली निरुपण,संध्याकाळी ५ ते ७ हरिपाठ श्रींची सायम आरती,
रात्री ७ ८.ते ३० भोजन प्रसाद,रात्री ८.३० ते १०.३० नामवंतांची कीर्तनाचे कार्यक्रम होतील रात्री ११ ते ४ नेमलेल्या भजनी मंडळाचा जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने देवगड येथे होणाऱ्या श्रीमद
भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!