कहार समाजाकडून २१ मे रोजी सामूहिक विवाह सोहळा….

गंगापूर (प्रतिनिधी)कहार कर्मचारी समाजसेवा ट्रस्ट आणि समस्त कहार कर्मचारी व कहार समाजाच्या संयुक्तविद्यमाने दिनांक २१ मे रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन संगम लॉन्स प्रवरासंगम, तालुका नेवासा, जिल्हा अ.नगर येथे करण्यात आले आहे. यापूर्वी तीन सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते.त्या विवाह सोहळ्यात ४१ वधु-वरांचे विवाह लावण्यात आले आहेत, यावेळी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ८ वधु वरांनी सामूहिक विवाह नोंदणी केली आहे.कहार कर्मचारी आणि कहार समाजाच्या वतीने दरवर्षी हा सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम राबवण्यात येतो. समाजातील लग्नातील वाढत्या खर्चाला आळा बसावा आणि शिल्लक पैशातून शैक्षणिक कामे, उद्योगासाठी कुटुंबासाठी त्या पैशांचा विनियोग व्हावा, गरीब श्रीमंत आणि सर्वांनी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झाले पाहिजे. सामाजिक एकोपा वाढला पाहिजे या हेतूने या सामूहिक विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. तसेच या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा, विशेष सामाजिक योगदान देणाऱ्यांचा, नौकरी, उद्योगात विशेष कार्य करणा-यांचा विशेष सत्कार केला जातो. आधुनिक पिढीसाठी सामाजिक आदर्श उभे राहिले पाहिजे व्यसनाधीनता, दूर झाली पाहिजे आणि खर्चाची बचत झाली पाहिजे या उद्देशाने कहार कर्मचारी समाजसेवा ट्रस्टच्या पुढाकाराने सामूहिक विवाह सोहळ्याचा आयोजन करण्यात येते महाराष्ट्रातल्या संपूर्ण कहार समाज बांधवांनी या सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहावे, आर्थिक मदत करून सहभागी व्हावे असे आवाहन कहार कर्मचारी समाज सेवा ट्रस्ट, महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष पंडुरे आणि समस्त कहार कर्मचारी-कहार समाजा व आयोजकांच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सदस्य डॉक्टर प्रशांत पोपटराव पंडुरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!