आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील “पैस” खांबाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील “पैस” खांबाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

नेवासा(प्रतिनिधी)आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील “पैस” खांबाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.एकादशीच्या निमित्ताने मंदिराचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वेदमंत्राच्या जयघोषात माऊलींच्या पैस खांबासह विठ्ठल रुख्मिनीच्या मूर्तींना अभिषेक घालण्यात आला.
आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रिग लागली होती.पहाटे चार ते पाच या वेळेत नेवासा येथील बालरोग तज्ञ डॉ.मनोज देशमुख सुनीता देशमुख व डॉ संदीप देशमुख व डॉ. सारिका देशमुख यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिनी व माऊलींच्या “पैस” खांबास चंदन उटी लावून अभिषेक करण्यात आला त्यानंतर पहाटेच्या सुमारास आरती करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे पौरोहित्य पिंप्री शहाली येथील शुभम जोशी यांनी केले.
यावेळी आलेल्या भाविकांचे संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त रामभाऊ जगताप,कृष्णाभाऊ पिसोटे,कैलास जाधव सेवेकरी भगवान सोनवणे व भैय्या कावरे यांच्यासह भक्त मंडळींनी स्वागत केले.यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी दर्शन बारीची व्यवस्था मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली होती.भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून मंदिर सेवेकरी मंडळातील सदस्यांनी विशेष भूमिका बजावली.यावेळी मंदिर प्रांगणातील प्रवेशद्वाराच्या समोर कलाशिक्षक चित्रकार रवी महागावे यांनी काढलेली रांगोळी सर्व भाविकांचे आकर्षण ठरले होते.
आषाढी एकादशी असल्याने नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली
बंदोबस्त करण्यासाठी आलेले नगर येथील पोलीस निरीक्षक विजय करे,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात,मनोज मोढवे,पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, शहर बिट प्रमुख तुळशीराम गीते यांच्यासह महिला व पुरुष होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.एकादशीच्या निमित्ताने केळी,रताळी,बटाटे,आंबे या फळांची आवक मोठया प्रमाणात झाली होती
तर नेवासा शहरातील संत तुकाराम महाराज मंदिर, विठ्ठल रुख्मिणी मंदिर,श्री मोहिनीराज मन्दिर येथे ही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यानिमित्ताने असंख्य दिंड्यांनी
माऊली मंदिरात हजेरी लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!