प्रति पंढरपूरला उसळला लाखोंचा जनसमुदाय ,भक्तांचा महासागर – चोख पोलीस बंदोबस्तात लाखों भाविकांनी घेतले दर्शन*

प्रति पंढरपूरला उसळला लाखोंचा जनसमुदाय ,भक्तांचा महासागर – चोख पोलीस बंदोबस्तात लाखों भाविकांनी घेतले दर्शन ,
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर हद्दीतील ,”छोटे पंढरपूर,प्रति पंढरपूर ” भक्तांचा महासागर उसळला ,पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पण सपत्नी पांडुरंगाचे दर्शन घेतले , पुजा आरती केली मनोभावे दर्शन घेतले मंदिर ट्रस्टी मंडळींनी कडुन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचा सत्कार करण्यात आला, पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे , सहाय्यक पोलीस उपायुक्त ‘ थोरात ,पोलीस निरीक्षक संदिप गुरमे,पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गीता बागवडे , यांच्या सोबतच पोलीस निरीक्षक श्री दिलीप गांगुर्डे यांनी पोलीस आयुक्त यांना , मंदिर व परिसराची पाहणी व बंदोबस्त बद्दल माहिती देण्यात आली ,गर्दी भरपुर आहे,दर्शन रांगेसाठीही पोलीसांची तत्परता ,

ठिक – ठिकाणी चौका – चौकात पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ” पाकिट मार मोबाईल चोर,मणी मंगळ – सुत्र , गळ्यातील पोथ,चैन गर्दिच्या फायद्यात ,लोटालाटी करत चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्यासाठी , पोलीसही वारकरी दवेशातही पोलीस बंदोबस्त तैनात आहे , महिला व पुरुष , नागरिकांनी ही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे,काही गडबड संशय वाटल्यास ,डायल 112 करून ताबडतोब मद्त मिळवा किंवा जवळील पोलीसांना माहिती द्यावी असे आवाहन ही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे – ठिक ठिकाणी चहा , मसाला दुध,शाबुदाणा खिचडी,केळी, राजगिरा लाडू, पाणी बाॅटल,पाणी जार ची व्यवस्था करण्यात आली होती,पायी दिडयांचे आकर्षण,टाळ,मृदंग,ढोलकी,पेटी,अंभग,भारूड ,गवळण ,फुगडी खेळत,नाचत,ठुमकत,भक्तीमय वातावरणात बघायला मिळत होते,” सर्व राजकीय पक्षांनी फराळांंची ठिक- ठिकाणी केली होती ,अनेक नेते मंडळी पाई आले ,तर काही‌आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह विठ्ठल – रुक्मिणी च्या दर्शनासाठी आल्याचे दिसुन आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!