जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या तब्बल १९९८ जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द..

सर्वाधीक पैठण ४६९ तर खुलताबाद २०

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण १ हजार ९९८  उमेदवारांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे यांनी काढले आहेत.सर्वाधीक पैठण ४६९ तर खुलताबाद २०

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
जानेवारी, २०२१ मध्ये पार पडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे ६१७ ग्रामपंचायतीमधील राखीव प्रवर्गातून निवडून आलेले सरपंच/ सदस्य यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम १०-१ अ व कलम ३०-१ अ मधील तरतुदीनुसार अशा सदस्यांची निवड भुतलक्षी प्रभावाने रद्द करून ती सदस्य म्हणून राहण्यास निरर्ह ठरविणे आवश्यक असल्याने
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४ दिनांक २० जानेवारी २०२२ आणि ग्रामविकास विभाग मुंबई यांचे परिपत्रक दिनांक १० मे २०२२ अन्वये निश्चित केलेल्या मुदतीत औरंगाबाद जिल्हयातील ०९ तालुक्यांतील विवरणपत्रामधील नमुद जानेवारी २०२१ मधील राखीव प्रवर्गातील निवडून आलेले १९९८ ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेल्या वाढीव मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डे यांनी प्राप्त असलेल्या अधिकारानुसार १ हजार ९९९ ग्रामपंचायत सदस्यांनी विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याने औरंगाबाद जिल्हयातील ०९ तालुक्यातील जानेवारी, २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीमधील संदर्भ क्र. ४ अन्वये दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यामुळे सोबत जोडलेल्या विवरणपत्रामधील १९९८ ग्रामपंचायत सदस्यांची निवड भुतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात आले असल्याचे घोषित
करण्यात येत असून संबंधितांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास निरर्ह ठरविण्यात आले आहे.
तालुका निहाय रद्द करण्यात आलेले ग्रामपंचायत सदस्य पूढील प्रमाणे सर्वात जास्त पैठण ४६९, सिल्लोड १९७, वैजापूर १५०, छत्रपती संभाजीनगर ११८, गंगापूर १०४ , फुलंब्री ५४, कन्नड ५०, सोयगाव ३६, तर सर्वात कमी खुलताबाद २० ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले असुन गंगापूर तालुक्यातील रद्द करण्यात आलेले ग्रामपंचायत सदस्य पूढील प्रमाणे वडाळी नाना मोरे , सुरेश खंडेराव मांगे,वडगाव टोकी प्रकाश भागाजी दाभाडे, कारभारी पंढरीनाथ बिडवे, वर्षा नितीन शेजवळ, किशोर अंबादास पिठले वाहेगाव लक्ष्मण भावराव पारखे, संगीता बाबासाहेब पारखे , रविंद्र गिरजेराव तगरे, प्रमिला उद्धव चाफेकर,येसगाव शोभाबाई अशोक जाधव,झोडेगाव नानासाहेब आसाराम मंडलीक पिंपळवाडी प्रमिला संदिप शिंदे,पाचपिरवाडी वंदना गणेश किर्तीकर, वाल्मीक आसाराम नायमाने,नवाबपूर सुनिता दिनेश जैस्वाल,अंकीताबाई काशीनाथ मतकर,रायपूर मालनबाई रायभान किर्तीकर, मीनाबाई अंबादास किर्तीकर,रांजणगांव शेनपुंजी पंकज गोरखनाथ हिवाळे,सावंगी सुनिता सुदाम मढीकर, मयुर उमेश जैस्वाल,सावखेडा मच्छींद्र बलवंता मोरे, संभाजी भागचंद बुट्टे, मंडाबाई ताराचंद गहिरे,शेंदुरवादा वच्छलाबाई बबन वाघमारे, सिरेगाव कविता रामेश्वर कुकलारे, कैलास मुरलीधर गायकवाड, पांडुरंग साहेबराव कुकलारे, तळपिंप्री राजेंद्र उत्तमराव मनोहर, कडूबाई चांगदेव लोणकर, तुर्काबाद नितीन नामदेव नाडे, दगडाबाई दशरथ पवार, शशिकला नामदेव पवार, फकीरचंद शेषराव राहाटवाड, अमोल जम्मनराव तोडकर
वडाळी भगवान पुंडलिक दोंदे, लांझी
सुशीला नंदू नाईक, महेबूबखेडा चांगदेव नामदेव मकासरे, गौरी प्रविण राऊत, सुनिता रामदास राऊत, माळीवाडगाव सुनिता शरद मोरे, मालुंजा खु. योगेश दौलत काकडे, सुनंदा राजकुमार चौधरी, अर्चना विलास साळवे, मांडवा येणूबाई रावसाहेब खंडागळे, साहेबराव लक्ष्मण पवार, किशोर विनायक शिंदे, केसरबाई गोपीनाथ दळे, मांगेगाव लक्ष्मन लेणूजी खरात,मांजरी राजेंद्र कोंडीरम माघाडे , नेवरगांव मीराबाई अहिलाजी गायके, सुरेखा विजय चोथे, नंदा अशोक कनगरे, बाळू कुंडलिक गायकवाड,पिंपळगाव दिवशी मिनाक्षी संदीप थोरात, स्वरूपचंद भीमराज बडोगे,प्रतापपुर उत्तम नारायण भगुरे.भिवधानोरा दत्तात्रेय साहेबराव लांडे , निवृत्ती शंकर दळे,धामोरी खुर्द गजराबाई शेकनाथ धनुरे, मंगल कचरु रणयेवले, डोमेगाव वैशाली सिध्दार्थ दाभाडे, एकलहेरा शाबेरा सरदार शेख, फुलशिवरा कारभारी काशिनाथ गवळी, गाजगांव असाराम माणीकराव सोनवने, गणेशवाडी आरीफा राजूभाई शेख, घोडेगाव निकीता बाळासाहेब दातरे, केशव गणपत विर, जांभाळा साजन रुपचंद तावणे, सुमनबाई गोरखनाथ घोडके, सुरेखा सुधाकर दाणे, सचिन अशोक मंजुळ, लिलाबाई गुलचंद पवार, जामगाव उपसरपंच सोनाली गणेश पंडित, वत्साबाई आंतवन जगताप, अनुसया किसन बर्वे,कायगांव विरसेन रघुनाथ उचित,संगिता दशरथ बिरुटे, शांताबाई माधव फाजगे,कनकोरी कैलास दगडू कैतके, नागू अंबादास जाधव, चंद्रकला कैलास डव्हाण, काटेपिंपळगाव सुनिता दत्तु जानराव, शारदा दादासाहेब पवार,कासोडा निलाबाई राधाकिसन देवबोने, गोकुळ साहेबराव चव्हाण, मुकूंद किसन गिरबोने,किन्हळ कौसाबाई पुंडलिक बनकर,लांझी नर्मदाबाई बाबुराव पवार आदींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!