संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनांच्या अर्ज प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकारांना तात्काळ थांबवा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनांच्या अर्ज प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकारांना तात्काळ थांबवा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
गंगापूर (प्रतिनिधी) शासकीय योजना सर्वसामान्याच्या कल्याणाकरिता राबविण्यासाठी अधिकारी आणि प्रशासन शासनाचे दोन चाक आहेत. गरीब, वंचित,पीडित, अनाथ व निर्धार लोकांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी सुद्धा जबाबदारी असल्याचे गंगापूर तहसील कार्यालय येथे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतीत आयोजित बैठकीदरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

विरोधी पक्षनेते आमदार आंबादास दानवे हे २ जुन रोजी दुपारी तीन वाजता गंगापुर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तहसील कार्यालय येथे त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कृषी, पाणीपुरवठा,जलसंधारण,रोजगार हमी योजना,आरोग्य,शिक्षण,अन्न पुरवठा विभाग,संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना विभाग अंतर्गत राबवित असलेल्या विविध योजनाची माहिती व सद्य परिस्थिती जाणून घेतली तसेच नगर पालिकेच्या घरकुलासाठी आलेल्या ५६ कोटी रुपयापैकी ठेकेदाराने प्रत्यक्षात २० लाख रुपयांचे काम केले असतानाही ठेकेदाराला चार कोटी रुपये कोणत्या आधारावर दिले ते पैसे कोण वसुल करणार
श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजना या अनाथ व गरीब लोकांच्या जीवनाशी निगडीत योजना असून त्यांना प्रभावीपणे राबविले गेले पाहिजेत. गंगापूर तहसील कार्यालय अंतर्गत या योजना बाबतीत गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा प्रकार तात्काळ थांबवून वयस्क लोकांचे वैध अर्ज लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे, व अर्ज घेतांनी कागदपत्राची पुरतता करून घ्यावी व अगोदरचे अर्ज मंजूर करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

तसेच शासकीय सूचनांप्रमाणे येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी सर्व गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत असून त्यांच्या या समस्यांचे निराकरण व्हावे, अशाही सूचना त्यांनी तहसील प्रशासन व बँक कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.

यावेळी तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार रूपालीताई मोगरकर,उप जलसंधारण अधिकारी शरयूताई आरजवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ सुदाम लगास, नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे , पंचायत समिती गट गटविकास अधिकारी संजय गायकवाड,पाणी पुरवठा उपअभियंता आपसिंगेकर, बांधकाम विभाग उप अभियंता बिरगावकर,पंचायत समिती कृषी अधिकारी विजयकुमार, एकात्मिक बालविकासचे निलेश राठोड, पुरी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील,तालुकाप्रमुख दिनेश मुथा,महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभाताई जगताप उपजिल्हा संघटक लता पगारे व तालुका संघटक अर्चना सोमासे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!