ढोरेगाव येथील शिवना नदीचा पुलाखाली नेपाळी वेटरचा मृतदेह आढळल्याने खळबळ


गंगापूर (प्रतिनिधी)अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ढोरेगाव येथील शिवना नदीच्या पुलाखाली एक ३१ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ढोरेगाव परीसरातील एका हाॅटेलवर वेटर असलेला वसंत हिरालाल अधिकारी मुळ राहणार नेपाळ जिल्हा दांड याने तिन दिवसांपुर्वी पगार घेऊन दिवाळीसाठी लिंबेजळगाव येथील भावाकडे जात असल्याचे सांगून निघून गेला होता.


परंतु त्याचा मृतदेह ११ नोव्हेंबर रोजी काही कामगार आर्मीचे केबल दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांना दुर्गंधी यायला लागली त्यांना अगोदर वाटले की एखादा प्राणी असेल परंतु थोडे जवळजावुन पाहीले असता तरुनाचा मृतदेह पाहून कामगारांनी गंगापूर पोलीस स्टेशन येथे फोन करून याची माहिती दिली असता तात्काळ गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक अझहर शेख त्यांच्या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी पुलावरतीच गर्दी केली होती त्याचा मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असुन या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!