सावधान.. गंगापूर येथील शेतकऱ्याच्या तिन जर्शी गाईवर अज्ञात चोरट्यांनी मारला डल्ला

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर कायगांव रोडवरील शेतातील गोठ्यात बांधलेल्या एक लाख रुपये किंमतीच्या तिन गायी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील भवानीनगर येथील रहिवासी शुभम साहेबराव धनायत 29 वर्षे यांचे गंगापुर शिवारातील गट नं १३४/२ मध्ये जोडधंद्यासाठी तीन जर्शी HF गाई घेतल्या होत्या त्या गाईसाठी शेतात गोठा बांधलेला असुन त्यात १२ ऑगस्ट रोजी दिवसभर गाई शेतात चरण्यासाठी सोडल्या संध्याकाळी सहा व वाजता तीन गाई दोन वासरे गोठ्यात बांधुन चारापाणी करून घरी आलो रात्री दहा वाजता वडील साहेबराव धनायत शेतातुन घरी आले तेव्हा सर्व जनावरे गोठ्यात होती १३ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता भगवान जनार्धन धनायत याचा फोन आला कि, गोठ्यातील गाई वासरे दिसत नाही फोन ठेवून ताबडतोब वडील् व फिर्यादी यांनी घटनास्थळी भेट दिली असता गोठ्यातीत गाई वासराचा आजू बाजूला शेतात शोध घेतला असता बाजुचे शेतात बांधलेले दिसले. परंतु गाई दिसल्या नाही त्यामुळे त्यांचा शोध घेतला होतो परंतु काही उपयोग झाला नाही. रात्री कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. त्या गाईचे वर्णन खालील प्रमाणे. १) एक काळ्या रंगांची गाय कपाळावर पांढरा काळी बांडी शिंग नसलेली कि. अंदाजे२५ हजार रुपये, २) एक जर्शी HF गायीच्या कपाळावर पांढरा ठिबका असलेली ३५ हजार रुपये, ३) एक जर्शी HF गाय पांढरी बाडी रंगाची कपाळावर पांढरा ठिबक असलेली गाभण असलेली किंमत ४० हजार रुपये, अशा तीन गायी अज्ञात चोरांनी चोरुन नेल्याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!