धडाकेबाज कामगिरी. गंगापूर तालुक्यातील चार आरोपी. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक चालकास गावठी कट्टा दाखवून लुटणारीआंतरजिल्हा टोळी ४८ तासात पकडली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक चालकास गावठी कट्टा दाखवून लुटणारी आंतरजिल्हा टोळी ४८ तासात पकडली. लुटमार करणा-यामध्ये गंगापूर तालुक्यातील चार आरोपींचा समावेश

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर रोडवर ट्रक चालकास गावठी कट्टा दाखवून लुटणा-या आंतरजिल्हा टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४८ तासात मुसक्या आवळल्या असुन चार लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या टोळीमध्ये गंगापूर तालुक्यातील चार गुन्हेगारांचा समावेश आहे

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ ऑगस्ट रोजी हनुमान सुखदेव गीते रा. पिंप्री खुर्द ता. जिंतूर जि. परभणी यांच्या ट्रकला गंगापूर वैजापूर रोडवर कार आडवी लावून लुटले होते या प्रकरणी गिते यांच्या फिर्यादीवरून पो.स्टे गंगापूर गुरन- ३७५/२०२३ कलम- ३९५ भा.द.वी प्रमाणेे गुन्हा दाखल होता.
पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे गंगापूर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा नमुद गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, वरील गुन्हा हा श्याम शेषेराव चव्हाण, रा. साळेगांव तांडा ता. जि. जालना ह.मु. हरीगोविंदनगर, खरपुडीरोड जालना यांने त्याचे साथीदारसह केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्तबातमीवरून जालना येथे जावून सापळा रचून शोध घेतला असता यातील संशयीत आरोपी वाहनासह मिळून आला त्यास नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव श्याम शेषेराव चव्हाण, वय 37 वर्ष, रा. साळेगांवतांडा ता.जि. जालना, ह.मु. हरीगोविंदनगर, खरपुडी* रोड, जालना असे सांगितले. त्यास विश्वासात घेवून गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता वरील गुन्हा त्याचे साथीदार गणेश शांताराम रोकडे रा. जिकठाण ता. गंगापूर, अविनाश रघूनाथ खंडागळे, रा. कानडगांव ता. गंगापूर, विशाल उर्फ देवा रामभाऊ पवार रा. सिध्दापूर ता. गंगापूर, बाबासाहेब विष्णू देवकर रा. सिध्दापूर ता. गंगापूर व इतर यांच्यासह केल्याचे कबूल केले. तसेच त्याच्या साथीदारांचा शोध घेतला असता चौघे त्यांचे राहत्या घराचे परिसरात मिळून आले त्यांचेकडील अधिक चौकशी केली असता त्यांनी नमूद गुन्हा केल्याची कबूली दिली व त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस करून त्यांनी गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन टाटा झेस्ट, दोन मोटार सायकल, एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत राऊंड व तसेच गुन्हयात वापरलेले मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ७६ हजार रूपयांचा मुददेमाल त्यांचे ताब्यातून जप्त करण्यात आला आहे
गुन्हयातील आरोपी १) श्याम शेषेराव चव्हाण, वय 37 वर्ष, रा. साळेगांवतांडा ता.जि. जालना, ह.मु. हरीगोविंदनगर, खरपुडीरोड, जालना २) गणेश शांताराम रोकडे रा. जिकठाण ता. गंगापूर, ३) अविनाश रघूनाथ खंडागळे, रा. कानडगांव ता. गंगापूर, ४) बाबासाहेब विष्णू देवकर रा. सिध्दापूर ता. गंगापूर यांना पुढील तपासकामी गंगापूर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
या गुन्हयांचा तपास गंगापूर पोलीस करीत आहे तपासामध्ये आरोपी कडुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, स.पो.नि.सुधीर मोटे, पो.उप.नि.विजय जाधव, पो.उप.नि.भगतसिंग दुलत, पोह नामदेव शिरसाठ, पोह रवी लोखंडे, वाल्मीक निकम, पोना अशोक वाघ, पोअ आनंद घाटेश्वर, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!