अहो आश्चर्यम गंगापूर तालुक्यात अवतरले डुक्कर चोर चक्क पन्नास हजारांचे डुक्कर चोरीला

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लिंबे जळगांव येथे डुक्कर मालकाला जबर मारहाण करून पन्नास हजार रुपयाचे चार डुक्कर चोरणाऱ्या पाच आरोपीवर वाळुज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जालिंदर रामभाऊ कोऱ्हाडे राहणार लिंबे जळगाव तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर यांच्या येथे १० एप्रील रोजी पहाटे दिड वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव स्मशानभूमी जवळ यातील फिर्यादी जालिंदर रामभाऊ कोऱ्हाडे राहणार लिंबे जळगाव यांचे ५० हजार रुपये किमतीचे लहान मोठे आकाराचे एकूण चार डुक्कर यातील आरोपी रवी राजू ढोकळे २१ रा.अजवा नगर वाळूज, सनी राम गायकवाड १९ वर्ष रा. साठे नगर तालुका पैठण ,विजय ज्ञानेश्वर जाधव वय १९ वर्ष रा. साठे नगर तालुका पैठण, आकाश संजय मंजुळ वय २१ वर्ष राहणार वडगाव कोल्हाटी ,करण मारुती गायकवाड वय २२ वर्ष राहणार वडगाव कोल्हाटी
यांनी फिर्यादी जालिंदर रामभाऊ कोऱ्हाडे व त्यांचा मुलगा शुभम यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून बळजबरीने चार डुक्कर दोन लहान दोन मोठे दोन चाकी गाडीवरून चोरून नेले आहे या प्रकरणी वाळुज पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना स्थळाला सहाय्यक पोलीस आयुक्त छावणी विभाग महेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे वाळुज पोलीस उपनिरीक्षक वाळुज अजय शितोळे यांनी भेट दिली असुन अधिकारी पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे वाळुज पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!