रमजान महिन्यातील दुर्दैवी घटना तळ्यात बुडून गंगापूर येथील युवकाचा मृत्यू


गंगापूर (प्रतिनिधी) शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या गंगापूर येथील २२ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू.रमजान महिन्यात ही घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गंगापूर शहराजवळील जाकमाथवाडी शिवारातील एका शेत तळ्यात ८ एप्रिल रोजी ४ वाजता मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी हमजा हसन शेख वय २२ राहणार एक मिनार चौक गंगापूर हा शेत तळ्यात ठिबकच्या नळ्याला धरुन पोहत असताना तो बुडाला असता तो बुडाल्याची माहिती तेथील मित्र व नागरिकांनी मोरया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, यांना दिली असता ते मित्र अली शेख, रामेश्वर जोंगदड, सागर साळवे यांना घेऊन घटनास्थळी धाव घेत शेत तळ्यात उड्या मारून त्या युवकाचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले व मोरया रुग्णवाहिका मध्ये टाकुन गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!