बिबट्याच्या सोबत शेतकऱ्याचा पंधरा मिनिट थरार अगरकानडगांव येथील घटना शेतकऱ्यांसमोर बोकडाचा फरशा पाडला . बिबट्यास जेरबंद करण्याची नागरीकांची मागणी.

 

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील अगरकानडगांव शिवारात झोपडीत शिरून शेतकऱ्याच्या पायाजवळ बिबट्याने बोकडाचा फरशा पाडला पंलगावरुन शेतकऱ्यांने लाकडे फेकून मारल्याने बिबट्या ऊसाच्या शेतात पळाला ही घटना आज ५ मार्चच्या पहाटे दिड वाजता घडली.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
अगरकानडगांव येथील शेतकरी नजीर उस्मान शेख हे स्वतःच्या गट नंबर १०० मध्ये ४ मार्चला शेतातील पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता शेतातील छपरामध्ये पाणी भरून पंलगावर झोपले व बाजूला पायापाशी बोकड्याला बांधुन ठेवले होते रात्री दिड वाजता बिबट्या छपरात घुसून बोकड्याची मान पकडल्याने बोकड व बक-या ओरडायला लागल्याने शेतकऱ्याला जाग आली समोर बिबट्याला बघुन दहा ते पंधरा मिनिटे शेतकरी नजीर शेख यांनी जवळील लाकडे बिबट्याच्या दिशेने भिरकावली त्यामुळे बिबट्या पळून बाजुच्या ऊसात पळाला त्यांच्या आवाजाने आजुबाजुचे शेतकरी मदतीला धावून आले. बिबट्याच्या तावडीतून आपण वाचलो असे त्यांनी उपस्थितांना सांगितल


दुसऱ्या घटनेत बिबट्याने बकरीचा फडशा पाडला गंगापूर तालुक्यातील बगडी येथील शेतकरी भाऊसाहेब लक्ष्मण बोडखे गट क्रमांक ७ यांच्या शेतवस्तीवर शेडमध्ये बांधलेल्या बकरीचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना रविवार ३ मार्च रोजी रात्री घडली आहे.शेतवस्तीवरून बिबट्याने तब्बल एक किलोमीटर बगडी गावाजवळील गटनंबर ४३/१ मधील शेतात बकरी ओढत आणली सकाळी शेतकरी कृष्णा बोडखे हे शेतात गेले असता त्यांना बकरी दिसून आली नाही. त्यांनी बकरी फरपटत नेल्याचा मागोवा घेतला असता गावाजवळील उसाच्या शेतात बकरी नेल्याचे दिसून आले.उसात जाऊन पाहिले असता फडशा पाडलेल्या बकरीजवळच बिबट्या दिसून आल्याने त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढत नागरिकांना घटनेची माहिती दिली.नागरिकांनी तात्काळ घटनेची माहिती वनविभागाचे नारायण चाथे यांना दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला . या घटनेने परिसरातील शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे .
वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ताबडतोब पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.अगरकानडगांव, ममदापूर, बगडीपरिसरात अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असून शेतकऱ्याच्या पशुधनावर बिबट्याचे हल्ले सुरूच आहे. शेतकऱ्यांना रात्री गहू,कांदा,पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. परिसरात बिबट्याच्या अधिवासाने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!