दुर्दैवी घटना. गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पित्यासह दोन चिमुरड्यांवर काळाचा घाला तर पत्नी गंभीर

 
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील पती व दोन चिमुकल्यांचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर वैजापूर रोडवर मांजरी पाटी जवळ मनोज नावंदर यांच्या माऊली शिवारातील गट क्रमांक ३३/२ मधील शेतात उत्तर प्रदेशचे दशरथ भुमसिंग रंधावे हे पत्नी व दोन मुलांसह गंगापूर येथुन जात असताना ८ फेब्रुवारी रोजी अंदाजे ९ वाजेदरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक मुलगा एक मुलगी व वडील जागेवर मृत झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, आकाश साळवे, अविनाश खाजेकर यांनी घटनास्थळावरून सर्वांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉ .आशिष पाटणी यांनी दशरथ भुमसिंग रंधावे (३०), कृष्णा दशरथ रंधावे (३) नानी दशरथ रंधावे (१) यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर त्याची पत्नी रुमा उर्फ राधिका दशरथ रंधावे (२५) ही गंभीर जखमी झाली असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला गंभीर जखमी रुमा उर्फ राधिका दशरथ यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक रमेश पवार, डॉ .आशिष पाटणे, डॉ. पवन मुंदडा, परिचारिका मुनीर शेख, गणेश गाणे यांनी प्रथमोपचार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!