दुर्दैवी घटना.हायवाने मोटारसायकलस्वारांना चिरडले वनरक्षक परीक्षेवरून परतणाऱ्या तीन सख्या भावंडांचा अपघातात करूण अंत


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) शेंद्रा येथुन सातारा परिसरातील घरी मोटारसायकलवर जाणा-या तिंघा भावंडांना पाठीमागून येणाऱ्या हायवाने चिरडल्याने बहीणीसह दोन भावांचा जागेवर मृत्यू झाल्याने अंभोरे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परीसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शेंद्रा येथे वनरक्षक लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे पदासाठी ग्राऊंड सुरू आहे. येथे मैदानी चाचणी देऊन परत येताना दुचाकीवरील तरुणी आणि तिच्या दोन भावांना भरधाव हायवाने चिरडल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता बीडबायपास येथे गुरु लॉन्ससमोर घडली.या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. या अपघातात प्रतिक्षा भगवान अंभोरे ( २२), प्रदीप उर्फ लखन भगवान अंभोरे ( २५) आणि प्रवीण भगवान अंभोरे ( २८) हल्ली मुक्काम सातारा अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान, बीडबायपासवरील गुरु लॉन्ससमोर भरधाव हायवाने तिघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. खाली पडलेल्या तिघांच्या अंगावरून हायवा गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी तिघांच्या रक्ताचा सडा पडलेला होता. सरकारी सेवेत रुजू होण्याचा केवळ एक टप्पा बाकी असताना तरुणीचा अपघाती मृत्यू झाला.तर बहिणीचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन्ही भावांना देखील काळाने हिरावले आहे.तीन कर्ते एकाच वेळी मृत्यूने दुरावल्याने अंभोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!