महावितरणच्या तिघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने पाच हजार रुपयांची लाच घेताना दिला शॉक


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – जळालेल्या विद्युत मीटरच्या बदल्यात दुसरे मीटर बसवून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने तीन जणांविरुद्ध बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौसष्ट वर्षीय तक्रारदाराच्या दोन मुलांच्या नावावर गुरुकृपानगर, गट क्रमांक-55, कमळापूर येथे असलेल्या घराचे व दुकानाचे जळालेले विद्युत मिटरच्या बदल्यात तक्रारदाराने उपलब्ध करून दिलेले दोन विद्युत मिटर बसवून देण्यासाठी वाळूज येथील म. रा. वि. म.चे वरिष्ठ तंत्रज्ञ शैलेश उत्तमराव जाधव वय ३८, यांनी खाजगी इसम दशरथ जगन्नाथ वाघमारे वय २९
याच्या मार्फत तक्रारदाराकडे बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. व शैलेश जाधव यांनी सांगितल्यावरून मराविमचे बाह्य स्त्रोत कर्मचारी आसिफ कासम शेख वय २२ याने स्वतः स्वीकारली.

याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलिस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उप आधीक्षक संगीता पाटील, पोलीस नाईक दिगंबर पाठक, पोलीस अंमलदार विलास चव्हाण यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!