गंगापूर तालुक्यातील घटना भावी नवरदेवाच्या अंगावर जीप घालून ठार केले.प्रेमविवाहातुन बापाने जावयाच्या मामा व मामेभावाच्या मोटारसायकल जोरदार धडक बोहल्यावर चढण्याच्या आधीच काळाचा घाला


गंगापूर (प्रतिनिधी) मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या बापाने जावयाचा मामा व मामेभावाच्या अंगावर जीप घालून ठार केल्याप्रकरणी वाळुज पोलीस स्टेशन मध्ये मुलीच्या बापासह पाच आरोपी विरोधात खुन व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोहल्यावर चढण्याच्या आधी काळाने घाला घातल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवराम एकनाथ मोढे वय 43 व्यवसाय शेती व ऊसतोड मुकादम राहणार ओझर तालुका गंगापूर यांच्या भाच्याने आरोपी सचिन भागचंद वाकचौरे राहणार धुपखेडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्या मुलीसोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शिवराम मोढे हे त्यांच्या मुलासह मोटारसायकल क्रमांक एम एच २० जी यु ४९४४ वरून स्वतःच्या गावी ओझरला जात असताना आरोपीं सचीन वाघचौरे याने बोलेरो जीप क्रमांक एम एच २० ई वाय ०६४५ यागाडीने त्याचा पाठलाग करून शेंदूरवादा ते सावखेडा रोडवर राष्ट्रमाता शाळेजवळ २८ मार्च रोजी दुपारी बारा ते पाऊण वाजेदरम्यान त्यांच्या मोटार सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली त्यामुळे शिवराम मोरे व त्याचा मुलगा पवन शिवराम मोढे वय (२६) वर्ष उंच उडून रोडवर पडले आरोपींनी पुढे जाऊन जीप गाडी वळवून आणली व पुन्हा फिर्यादी शिवराम मोढे यांच्या अंगावर घालून त्यास चिरडण्याचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला केला तसेच रोडवर पडलेल्या फिर्यादीचा मुलगा पवनच्या डोक्यावरून चाक नेऊन त्यास गाडीखाली चिरडून जागीच ठार केल्याप्रकरणी शिवराम मोढे यांच्या फिर्यादीवरून सचिन भागचंद वाकचौरे राहणार धुपखेडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर व ईतर पाच आरोपी विरोधात भादवी कलम ३०२,३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाळुजचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने हे करत आहे.
पवन मोढे यांचे लग्न ४ एप्रिल रोजी होणार होते परंतु बोहल्यावर चढण्याच्या आधी काळाने घाला घातला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!