अवैध वाळु वाहतूक करणारा ट्रॅक्टर गंगापूरच्या महसूल विभागाने पाठलाग करत पकडला.


गंगापुर (प्रतिनिधी)महसुल विभागाच्या पथकाने तालुक्यातील भालगाव येथील शिवना नदीपात्रातून बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पाठलाग करत पकडून वाळूसह जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.
तालुक्यातील वाळूची अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी गंगापुर चे तहसीलदार सतिष सोनी यांच्या आदेशावरून महसुलच्या भरारी पथकाने रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी अचानक धाड टाकली असता भालगाव नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करताना ट्रॅक्टर आढळून आले पथकाला बघून ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर सह पळ काढला मात्र तलाठी राठोड मेजर पठाण यांनी पाठलाग करून पळसगाव शिवारात वाळु भरलेल्या ट्रॉली सह ट्रॅक्टर क्र एम एच २० ए एस २६१६ पकडले चालक आकाश कृष्णा वीर राहणार उत्तरवाडी याचेकडे वाळु परवाना बाबत चौकशी केली असता कोणताही परवाना नसल्याचे तसेच ट्रॅक्टर मालक हे ईसाक अहमद शेख हे असल्याचे सांगितले त्यानंतर महसुल च्या पथकाने पंचनामा करून वाहन ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!