कुंटणखान्यासाठी बांधले हॉटेल..परराज्यातील तरुणी धंद्याला ५ तरुणींची सुटका.. हॉटेल मालकासह तिघांना अटक गंगापूर तालुक्यातील दोघांचा समावेश.

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) हॉटेल गॅलेक्सीवर पोलिसांनी धाड टाकून चालू असलेल्या कुंटणखान्यातील पाच तरुणींची सुटका करून कुंटणखाना चालविणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या.ग्रामीण पोलिसांची कारवाई.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुंदरवाडी
शिवारात निर्मनुष्य परिसरातील हॉटेल गॅलेक्सीमध्ये काही महिन्यांपासून सेक्स रॅकेट सुरू होते. जिल्हा पोलिसांनी सोमवारी रात्री हॉटेलवर डमी ग्राहक पाठवून छापा टाकला. त्यात परराज्यांतील ५ तरुणी आढळून आल्या. हॉटेल मालक संदीप भिकाजी खाजेकर (२६, रा. सिद्धनाथ वडगाव ता. गंगापूर), भावेश प्रवीण जाधव (२०, रा. रामनगर, हर्सूल) व वेटर जब्बार निजाम शेख (२६, रा. शिंगी, गंगापूर) यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिस अधीक्षक कलवानिया यांना काही दिवसांपूर्वी गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी उपअधीक्षक पूजा नागरे, सहायक निरीक्षक आरती जाधव यांना कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने डमी ग्राहक पाठवला. डमी ग्राहक आधी खाजेकरला भेटला. खाजेकरने चौकशी करून व्यवस्थापक भावेश जाधवकडे पाठवले. जाधवने ‘तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल’ असे आश्वासन दिले. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील १०१ क्रमांकाच्या खोलीत जाण्यास सांगितले. तेथे जाधवने पैशांचा व्यवहार करताच ग्राहकाने बाहेर उभ्या पोलिसांना मोबाइलवर इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!