गंगापूर शिवारात बिबट्याचे पिल्लू आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.


गंगापूर (प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या लगड वस्तीवर गव्हाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे परीसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर पासून जवळच असलेल्या मच्छिंद्र लगड व कैलास लगड यांच्या गट नंबर २५१ मधील शेतात ७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बिबट्याचे पिल्लू गव्हाच्या शेतात फिरताना दिसले असता त्याला शेतकऱ्यांनी पकडून डाल्याखाली झाकून ठवले व या घटनेची माहिती वनविभागाला कळविले असता वनविगाचे नारायण चाटे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत या पिल्लाची आई मादी बिबट्या गव्हाच्या शेतात फिरत असल्याने परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे या मादी बिबट्यासह आणखी पिल्लं असण्याची शक्यता नाकारता येत नाही . परीसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतक-यांनकडुन करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!