भेंडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचे गेट तोडुन चोरट्यांनी दानपेटी पळवून नेली.


गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील भेंडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचे गेटचा कोंडा तोडुन दानपेटी व मंदिरालगत असलेले घर फोडुन अज्ञात चोरटे दानपेटी घेऊन पळाले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भेंडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिर ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी बंद करून गेल्यावर रात्री अज्ञात चोरट्यांनी गेटवरील कुलुप कोंडा तोडुन उघडले व मंदीरात प्रवेश करुन मंदिरातील दानपेटी व लगतच असलेले संतोष धुमाळ यांच्या घराचा कडीकोंडा तोडुन घरातील सामानाची नासधूस करुन दानपेटी घेऊन पोबारा केला या पेटीत अंदाजे १० ते १५ हजार रुपये असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली असता पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!