गावठी कट्ट्यासह जामगांव येथे एकाला गंगापूर पोलीसांनी केली अटक


गंगापूर (प्रतिनिधी) गावठी कट्टासह दोन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत आरोपी गंगापुर पोलीसांनी जामगाव येथे पाठलाग करून जेरबंद केले


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १० आक्टोंबर रोजी रात्री 09:00 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे त्यांचे पथकासह जामगाव परिसरात पेट्रालिंग करत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, अनेक गुन्ह्यांतील आरोपी महेश काशिनाथ काळे (२८) रा. जामगाव ता. गंगापुर हा जामगाव येथे आला असुन तो रात्रीच्या वेळी दारू पिण्यासाठी जयहिंद साखर कारखाना परिसरात पायी जात असतो तो जवळ गावठी कट्टी बाळगतो.या माहितीच्या आधारे पो.नि. सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथकांने तात्काळ जामगांव येथे जावून गंगापूर सहकारी (जयहिंद) साखर कारखान्याच्या अलिकडे शेतात अंधारात आडोशाला सापळा लावला. यावेळी संशयीत महेश काळे हा दबा धरून बसलेल्या पोलीसांचे दिशेने येतांना पोलीसांचे नजरेस पडला असता तो जिल्हा परिषद शाळेच्या दिशेने पळत सुटला यावेळी पोलीसांनी पाठलाग करून त्याला थोडयाच अंतराव शिताफिने पकडले.
असता त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला जवळ एक काळया रंगाचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस (राऊंड ) अवैधरित्या विनापरवाना जवळ बाळगतांना मिळुन आला आहे. गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आले असून. आरोपी काळे विरूध्द आतापर्यत प्राणघातक हल्ला करणे, चोरी, दरोडा, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे आदी सारखे १४ गंभीर गुन्हे दाखल असुन यापैकी ४ गंभीर गुन्हयात तो गंगापुर पोलीसांना हवा होता
काळे विरूध्द पोलीस ठाणे गंगापुर येथे भादवी कलम ३ ,२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गंगापुर पोलीस करित आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार सहा. पोलीस अधीक्षक, वैजापुर उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी, , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, अमोल कांबळे, अभिजीत डहाळे, अतुल भवर, विजय नागरे, राहुल वडमारे, तेनसिंग राठोड, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!