वडगाव कोल्हाटी येथे जमीनीच्या तुकड्यासाठी भाऊकीत झालेल्या तलवारीच्या हल्ल्यात सहा जण जखमी

वडगाव कोल्हाटी येथे जमीनीच्या तुकड्यासाठी भाऊकीत झालेल्या तलवारीच्या हल्ल्यात सहा जण जखमी

वाळूज (प्रतिनिधी) – वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे गट नंबर ५९ मध्ये शेत जमिनीच्या वादातून साळे कुटुंबातील दोन गटात तलवारीने झालेल्या मारहाणीत सहाजन गंभीर जखमी झाले असून परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तलवारीने एकमेकांवर (हल्ला) सपासप वार करत असलेले व अंगावर शहारा आणणारे दृश्य व्हिडिओमध्ये दिसत असून तो व्हिडिओ सध्या वाळूज परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे.
या प्रकरणी राजेश तुकाराम साळे , वय ३५ वर्षे रा. गट न.८६ अयोध्या नगर वडगाव कोल्हाटी यांच्या फिर्यादीवरून मुकेश उर्फ बबलू त्रिंबक साळे , अभिषेक त्रिंबक साळे , ऋषिकेश त्रिंबक साळे,त्रिंबक आसाराम साळे रा.वडगाव कोल्हाटी ता.जि छपत्रती संभाजीनगर यांच्या विरोधात कलम ३०७,३४१,५०४,५०६,३४ भादंवि सह ४,२५ हत्यार कायदा ,१३५ मपोको प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना गट नंबर ५९,लाल माती, सीता नगर वडगाव कोल्हाटी येथे २० जुलै रोजी आकरा वाजता घडली आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीला ,त्याच्या भावाला व पुतण्याला जमिनीच्या वादावरून तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने व गंभीर जखमी केल्याने हल्ल्यात दोन्ही गटाचे सहा जण जखमी झाले असून परस्परविरोधी आठ जणांवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी वावळे पोलिस उपनिरीक्षक इंगोले हे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!