पठ्ठ्याने केले चक्क स्मशानभूमीत लग्न.. आक्रोश ,किंकाळ्यांऐवजी सनईचे सूर, राहत्याच्या जोडप्याचा थाटामाटात विवाह!

पठ्ठ्याने केले चक्क स्मशानभूमीत लग्न..

आक्रोश ,किंकाळ्यांऐवजी सनईचे सूर, राहत्याच्या जोडप्याचा थाटामाटात विवाह!

अहमदनगर (प्रतिनिधी)ज्या स्मशानभूमीत आयुष्याचा शेवट होतो तिथेच या जोडप्याने आपल्या सहजीवनाची सुरूवात केली आहे. अहमदनगरच्या राहतामध्ये हा लग्न सोहळा पार पडला.
स्मशानभूमी म्हंटल की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र राहाता शहरातील स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले असून या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या वडिलांनी आपल्या कन्येचा विवाह सोहळा  थेट स्मशानभूमीत लावत अंधश्रद्धेला फाटा दिला आहे. 
ज्या स्मशानभूमीत केवळ रडण्याचे आवाज ऐकायला मिळतात तीथे मंगलाष्टकाचे सुर ऐकायला मिळाले. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील स्मशानभूमीत हा आदर्श विवाह थाटामाटात पार पडला.
ज्या स्मशानभूमीत आयुष्याचा शेवट होतो तिथेच या जोडप्याने आपल्या सहजीवनाची सुरूवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता स्मशानभूमीत हा आगळावेगळा विवाह सोहळा पाहवयास मिळाला
राहता स्मशानभूमीत गेल्या 20 वर्षापासून काम करणारे गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच लावला.


स्मशानभूमीला अनेकजण अशुभ मानतात, मात्र याच स्मशानभूमीत विवाहाचे सर्व संस्कार पार पडले. अगदी थाटामाटात दोघांचा विवाह लावण्यात आला.
विषेश म्हणजे जातीपातीची बंधने झुगारून सुशिक्षित तरूणाने म्हसनजोगी समाजातील मुलीशी विवाह करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
मनोज जयस्वाल आणी मयुरी गायकवाड यांच्या विवाहासाठी शहरातील मान्यवरही उपस्थित होते, त्यांनी नवविवाहित जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामस्थांनी मुलीला संसार उपयोगी भांडी भेट दिली तर मुलीचे कन्यादान गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांचे सोयरे माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा व राजेंद्र पिपाडा यांनी करत विवाह सोहळ्यात सहभाग घेतला

मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं…

दरम्यान राहाता येथे मयुरीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले तर शिर्डीत वास्तव्य करणाऱ्या मनोज जयस्वाल यांचंही शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यानंतर दोघेही शिर्डी येथील एका ठिकाणी कामाला असल्याने त्यांची मैत्री झाली. पुढे याच मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. पुढे जाऊन त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. दोघांच्या घरच्यांनीही लग्नाला परवानगी दिली. विवाह सोहळा राहाता शहरात स्मशानभूमीच्या प्रांगणामध्ये थाटामाटामध्ये संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!