राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माहिती पाठविण्याचे तेजस फाउंडेशन नाशिक संस्थेचे आवाहन-अभिनेत्री मेघा डोळस

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माहिती पाठविण्याचे तेजस फाउंडेशन नाशिक संस्थेचे आवाहन-अभिनेत्री मेघा डोळस

नेवासा(प्रतिनिधी)तेजस फाऊंडेशन नाशिक या नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन तेजस फाउंडेशन नाशिक संस्थेच्या अध्यक्षा अभिनेत्री मेघा डोळस यांनी केले आहे.
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना संस्थेच्या अध्यक्षा अभिनेत्री मेघा डोळस म्हणाल्या की तेजस फाऊंडेशन ही आमची नोंदणी कृत सामाजिक संस्था असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केले आहे समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर गुणवंत व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे तरी सामाजिक साहित्यिक पत्रकारिता कला आरोग्यसेवा पर्यावरण रक्षा शैक्षणिक चित्रकला छायाचित्र इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना आव्हान करण्यात आलेले आहे
राज्यस्तरीय पुरस्कार 2023 अंतर्गत आदर्श पत्रकारिता, आदर्श शिक्षक, कलारत्न कला गौरव, खेळ रत्न क्रीडा गौरव, समाजभूषण जीवनगौरव, कला साधना,काव्यभूषण साहित्यरत्न, साहित्य गौरव पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार,वृक्षमित्र आरोग्य सेवा पुरस्कार वैद्य रत्न पुरस्कार व्यवसायिक सेवा पुरस्कार शौर्यरत्न पुरस्कार स्वयं सिद्ध पुरस्कार आदर्श माता पुरस्कार उत्कृष्ट चित्रकार पुरस्कार उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार इत्यादी पुरस्कार देण्यात येतील
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी इच्छुक मान्यवरांनी तेजस फाउंडेशनकडे आपली थोडक्यात माहिती फोटो पेपर कटिंग व्हाट्सअपवर दिनांक १५ जुलै २०२३ पर्यंत भ्रमणध्वनी क्रमांक 8007095522 /7888229617 यावर पाठवावी असे आवाहन संस्था प्रमुख मेघा डोळस यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!