पहाटेचा शपथविधी अखेर साक्षात उतरला! महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवारअजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री पदी, ९ एनसीपी आमदारांची मंत्रीपदी वर्णी; शरद पवार यांना धक्का

पहाटेचा शपथविधी अखेर साक्षात उतरला! महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री पदी, ९ एनसीपी आमदारांची मंत्रीपदी वर्णी; शरद पवार यांना धक्का
मुंबई (प्रतिनिधी)अजित पवार  यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली  आहे.

अजित पवार  यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली  आहे. आजच अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे
अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनावर दिली आहे.
शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला वर्षपूर्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनावर आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत एनसीपीच्या ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील आदींचा समावेश आहे. अजित पवारांना एनसीपीच्या ५० पैकी ४० पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. राजभवनावर आज शिंदे, भाजपा आणि एनसीपीचे आमदार एकत्र खेळीमेळीने बोलताना दिसले आहेत.

मागील काही दिवसांपासून भाजपा यासाठी जुळवाजुळव करत असल्याचं चित्र पहायला मिळत होते. एनसीपी मध्ये झालेल्या घडामोडींनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. परंतू अजित पवार यांनी आपण एनसीपीला सोडचिठ्ठी देणार नसल्याचं म्हटलं होतं. पण आज त्यांनी शरद पवार यांना धक्का दिला आहे. 

अडीज वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र दीड दिवसांतच शरद पवार यांच्यासोबत ते आले आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सध्या उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस देखील आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. त्यांची वर्णी केंद्रामध्ये लागणार का? याची देखील चर्चा आहे.

अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचा शपथविधी राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये झाला आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे, सुनील तटकरे देखील राजभवनात दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!