युवक क्रांतिवीर पुरस्काराने आमदार प्रशांत बंब सन्मानित

मुंबई (प्रतिनिधी) तालुक्यासह मराठवाडा व महाराष्ट्रात क्रांतिकारक काम करणारे गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांना मुंबई वाशी येथे युवक क्रांतिवीर पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
गंगापूर तालुक्यातील गावात जल जीवन मिशन अंतर्गतही प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पाणी देण्यासाठी १०७८ कोटी रुपयांच्या योजना मंजूर करून या योजनेचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरु असून अंतिम टप्प्यात आहे. मराठवाड्यातील पहिल्या गंगापूर उपसा जलसिंचन योजनेसाठी 600 कोटी रूपये मंजूर केले व या योजनेचे भूमिपूजन हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आरापूर शिवार येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले व प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली.अशा अनेक योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे . नद्यांनाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करून पाणी उपलब्ध केले. अशा दुरदृष्टी असलेल्या आमदार प्रशांत बंब यांना पूर्णवाद परिवारातर्फे दिला जाणारा युवक क्रांतिवीर पुरस्कार हा युवकांच्या साठी राजकारणाच्या माध्यमातून क्रांतिकारक काम करणाऱ्या नेतृत्वाला देण्यात येतो २०२४ चा पुरस्कार आमदार बंब यांना नवी मुंबई वाशी येथे सिडको कनव्हेक्शन येथे देण्यात आला याप्रसंगी नवी मुंबईचे पालकमंत्री गणेश नाईक लक्ष्मीकांत पारनेरकर व तसेच पारनेरचे आमदार निलेश लंके व पूर्णवाद परिवारातील सर्व युवक युवती उपस्थित होते या पुरस्काराबद्दल केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, लासूर स्टेशन बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव,
जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे,
भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील जाधव,, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब पाटील पदार, माजी नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे, दिपक साळवे, अशोक मंत्री,आमदार प्रशांत बंब यांचे स्वीय सहाय्यक रज्जाक पठाण,कृष्णकांत व्यवहारे, गोपाल वर्मा,,प्रशांत मुळे, अमोल शिंदे,दिनेश राऊत,अजय रासकर,निलेश डुकरे,रवी कुमावत, तेजस सोनवणे, संभाजी दांरुटे आदींसह मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!