वरखेड येथे म्हसोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील वरखेड येथे तिन दिवस चालणाऱ्या श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक.सांस्कृतीक कार्यक्रमासह छमीगोंड्यासह कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगापूर तालुक्यातील वरखेड येथे म्हसोबा महाराजांच्या यात्रेला ३० जानेवारी पासून सुरुवात होत असुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे संध्याकाळी कै.तुकाराम खेडकर यांचा तमाशा,३१ जानेवारी रोजी दुपारी छमीगोंडा, रात्री विठाभाऊ मांग यांचा तमाशा तर १ फेब्रुवारी रोजी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन सरपंच रोहिणी योगेश मोरे, उपसरपंच सोनाली आकाश उबाळे, रामनाथ वाघ, वाल्मिक राऊत,सयराम राऊत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!