सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून अल्पवयीन मुलीचा विनायभंग केल्याप्रकरणी एकावर पोस्कोअंतर्गत गुन्हा

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर स्टेशन येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून सदरचा व्हिडिओ सोशिअल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
लासूर स्टेशनला अल्पवयीन मुली व महिलावरील अत्याचारात गेल्या सहा महिन्यात भयानक वाढ, पोलिसांचा खाबुगिरीमुळे गुन्हेगारांना बसेना आळा…..
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील एका अल्पवयीन मुलीला दौलताबाद येथील एका आकाश जाधव (१९) नराधमाने १७ जानेवारी रोजी ९ ते १०.३० वाजेदरम्यान फिर्यादी अल्पवयीन मुलीस पोळ रांजणगाव शिवारातील एका घरात नेऊन फिर्यादीचे दोन्ही हात धरून तिला पलंगावर टाकून तिच्या छातीवर हात फिरवल्याने तिच्या मनास लज्जा निर्माण झाली व फिर्यादीच्या परवानगीशिवाय व्हिडिओ तयार करून सोशिअल मीडियावर (इंस्टाग्राम ॲपवर) पाठविला आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून सदरचा व्हिडिओ सोशिअल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी शिळेगाव पोलीस ठाण्यात कलम ३५४,३५४ क ,भा. द.वी सह कलम ८ बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ६६ बी , पोस्को व इतर गुन्हे दाखल माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके हे करत आहे.
दरम्यान गेल्या सहा महिन्यात शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात रोडरोमिंयो व गुन्हेगारावर शिल्लेगाव पोलिसांचा वचक राहिला नसल्याने अल्पवयीन मुली,महिला यांच्यावर होणाऱ्या आत्याचाऱ्यात भयानक वाढ झाली असल्याचे गावकरी बोलत असून रोड्रोमिंयो व अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांवर शिल्लेगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी गावाकऱ्यांनी केली असून तात्काळ अश्या प्रकारचे गुन्हे कमी करण्यासाठी शिल्लेगाव पोलिसांनी प्रयत्न करावे नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही काही गावकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!