एक लाख साठ हजारचा गुटखा एक चारचाकी वाहन जप्त

लासूर स्टेशनच्या गीताबन येथे लेडी सिंघम पोलीस अधिकारी महक स्वामी यांचा अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर छापा


गंगापूर (प्रतिनिधी)
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील लासूर स्टेशन येथील गीताबन येथे आज प्रशिक्षणाधिकारी पोलीस अधीक्षक लेडी सिंघम पोलीस अधिकारी महक स्वामी यांनी अवैध गुटखाविक्री करणाऱ्या दुकानावर आज दुपारी अडीच वाजता छापा टाकला असता यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा, सुगंधित तंबाकू जप्त करण्यात आली असून एम एच 20 वाय 5586 ही मारुती 800 चारचाकी मुद्देमालासह जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान मुद्देमाल व गुटखा लासूर स्टेशन येथील पोलीस चौकीत जप्त करण्यात आलेला असून गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!