शेताच्या बांधावरुन दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी…पाच गंभीर तर दहा किरकोळ जखमी…

शेताच्या बांधावरुन दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी…
पाच गंभीर तर दहा किरकोळ जखमी…
गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील नेवरगाव येथे शेताच्या बांधावरुन दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले तर दहा जण किरकोळ जखमी झाले असून गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे २८ मे रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान भागीनाथ वालतुरे यांच्या शेतात वालतुरे व हाडोळे कुटुंबात शेताचा बांध का कोरला असे म्हणून भांडनाला सुरवात झाली भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले या मारारीत भागीनाथ वालतुरे ५५,शुभम वालतुरे २५,सौरभ वालतुरे २० , योगेश वालतुरे ३० यांच्या डोक्याला हाताला व पायाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले यांना जखमी अवस्थेत गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले तर सचिन वालतुरे ३७ राहणार नेवरगाव याला उपचार करून घरी पाठवले तर सुरेंद्र हाडोळे ४२,शहादू एकनाथ हाडोळे ७१,जितेंद्र शहादू हाडोळे ४५,ओमकार सुरेंद्र हाडोळे १६,महेश शहादू हाडोळे ४०,शुभम सुरेंद्र हाडोळे १८,सुनंदा शहादू हाडोळे ६५,शारदा सुरेंद्र हाडोळे ४०,श्रद्धा महेश हाडोळे १६,कांचन महेश हाडोळे १८ राहणार नेवरगाव हे किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येवून घरी पाठविण्यात आले या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!