शासकीय गोदामाजवळचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले…

शासकीय गोदामाजवळचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले…
गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील शासकीय गोदामाला खेटुन अतिक्रमण केलेल्या दहा ते पंधरा हून अधिक दुकानां तहसील प्रशासनाने जमिनदोस्त केल्या .
तहसीलदार सतीश सोनी यांनी २९ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात ही दुकान हटवली आहे. तेथील अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना प्रशासनाने वेळोवेळी नोटीसा देऊनही ही अतिक्रमण हटवण्यात आले नसल्याने शेवटी तहसील प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात करताच या भागातील अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमण काढून टाकले रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व अतिक्रमण काढण्यात आले प्रशासनाने केलेल्या कारवाईचं गंगापूरकरांनी स्वागत केले आहे.
अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार रामदास बोठे,मंडळअधिकारी बाळासाहेब जाधव, तलाठी गणेश लोणे, गंगापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनी शाईनाथ गिते, सपोनी अशोक चौरे तहसील कर्मचारी व पोलिस तळ ठोकुन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!