गंगापुर महसूल व पोलीसांची अवैध उत्खनन करणाऱ्या ११ वाहनांवर मोठी कारवाई, वाहने जप्त.

गंगापुर पोलीसांची अवैध उत्खनन करणाऱ्या ११ वाहनांवर मोठी कारवाई, वाहने जप्त.
गंगापूर (प्रतिनिधी)
जामगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध व बेकायदेशिररित्या गौणखनिज वाळूची उत्खनन करून चोरटी विक्री करण्यासाठी वाळू वाहतुक करणाऱ्या आकरा वाहनांवर गंगापुर पोलीसांनी पहाटे कारवाई करून वाहने जप्त करण्यात आले

*जप्त करण्यात आलेली वाहने*

केलेल्या वाहनात जेसीबी क्र.एम एच 13.ए एक्स 5411 ,टाटा कंपनीचे 909 मॉडेल टिप्पर क्र.एम एच -02.सि ई -8102 टाटा कंपनीचे 909 मॉडेल टिप्पर क्र. एम एच-20 सि टी-7115, केनी (ट्रॅक्टर बिनानंबर) टाटा कंपनीचे 909 मॉडेल टिप्पर क्र.एम एच-38.एक्स-2970 , टाटा कंपनीचे 909 मॉडेल टिप्पर क्र. एम एच-21, डब्ल्यु-6776 , केनी सह स्वराज कंपनीचे विनानंबरचे ट्रॅक्टर इंजिन नं. – EZ4001-SEN49297 व चेसिस नं.-MBNBU53ADNCN44461 टाटा कंपनीचे 909 मॉडेल टिप्पर क्र. एम एच-06, ए क्यु-1689-, टाटा कंपनीचे 909 मॉडेल दिप्पर क्र.एम एच-23, डब्ल्यु-0165 ,केनी सह महिंद्रा कंपनीचे विनानंबरचे लाल रंगाचे ट्रॅक्टर , टाटा कंपनीचे लाल पिवळ्या रंगाचे टिप्पर चेसीस नंबर MAT50720608134059 वरील वाहने ८ जुन रोजी पहाटे 06.00 वाजता जामगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात जेसीबी व केनीच्या सहाय्याने वाळुचे अवैध उत्खनन करत असल्याची ठाणे प्रभारी अधिकारी साईनाथ गिते यांना गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक औरंगाबाद मनोज कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी साईनाथ गिते, सपोनि अशोक चौरे, पोउपनि दिपक औटे, पोहेकॉ विजय भिल्ल, राहुल पगारे, पोलीस अंमलदार अभिजित डहाळे, संदीप राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, बलविरसिंग बहुरे व तहसीलदार सतिष सोनी यांना माहिती देवून त्यांनी तहसीलचे पथक जायमोक्यावर पाठवून पोलीसांसमक्ष जामगाव शिवारातील गोदावरी नदीच्या काठावर धाड टाकून एक जेसीबी, तिन केनी तसेच सात टिप्पर असे एकुण आकरा वाहने जप्त केले असुन पंचनामा केला आहे.वरील जप्त वाहनांवर व चालक मालकाविरुद्ध पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!