आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्त देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामध्ये पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजनपंढरपूर येथे दि.२६ जून ते ३० जून पंचदिनात्मक कार्यक्रम

आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्त देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामध्ये पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे दि.२६ जून ते ३० जून पंचदिनात्मक कार्यक्रम

नेवासा(प्रतिनिधी)श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर संस्थानच्या पंढरपूर येथील देवगडच्या मठामध्ये पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.श्रद्धेय गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत दि.२६ ते ३० जून या कालावधीत होणाऱ्या या पंचदिनात्मक सोहळयाची पंढरपूर येथे जय्यत तयारी सुरू आहे.
आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्ताने रविवारी दि.२५ जून रोजी पंढरपूर येथील सोहळयासाठी सकाळी ११ वाजता
श्री क्षेत्र देवगड येथून प्रस्थान होणार आहे,पंढरपूर येथील मठात पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी,भोजन व श्रींचे दर्शन झाल्यानंतर सोमवार दि.२६ जून रोजी पहाटे ४ ते ६ काकडा आरती,सकाळी ७ ते १० यावेळेत तीर्थक्षेत्र पंढरपूर प्रदक्षिणासाठी दिंडी निघेल यामध्ये श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पुष्पांनी सजवलेली पालखी असेल पालखी दिंडी प्रदक्षिणा झाल्यानंतर भीमा तिरी असलेल्या देवगडच्या मठामध्ये ११ ते १२ भोजन प्रसाद होईल त्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री नामदेव गाथा पारायण, सायंकाळी ५.३० ते ७ हरिपाठ आरती व रात्री ८.३० ते १०.३० कीर्तन होईल.
मंगळवारी दि.२७ जून रोजी पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ९ ते ११ नामदेव गाथा पारायण,११ ते १२ भोजन,दुपारी ३ ते ५ श्री नामदेव गाथा पारायण,सायंकाळी ५.३० ते ७ हरिपाठ, आरती भोजन त्यानंतर रात्री ८.३० ते १०.३० कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम रहाणार आहे.
गुरुवारी दि.२९ जून रोजी रात्री ८.३० ते १०.३० यावेळेत श्री गुरुदेव दत्त पीठ देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे कीर्तन होईल तर शुक्रवारी दि.३० जून रोजी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या सकाळी ७ ते ९ यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने पंचदिनात्मक आषाढी वारी पालखी सोहळयाची सांगता होणार असून भाविकांनी पंचदिनात्मक कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!