बालाजी दुध डेअरीच्या बोलेरो पिकअप चालकाला मारहाण करून दुधासह पिकअप पळवली. गुन्हा दाखल..


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर येथील बालाजी दुध डेअरीची बोलेरो पिकअप अडवून चालकाला मारहाण करून दुधासह पिकअप पळवल्याची घटना शिल्लेगांव हद्दीत घडली या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप मुरलीधर रोकडे वय 35 वर्षे धंदा ड्रायव्हर रा. वाहेगाव ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस चौकी लासुर स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षे पासुन बाबासाहेब मच्छिंद्र गायके यांचे गंगापुर येथील बलाजी दुध डेअरीची बोलेरो मॅक्सी पीकअप नं. एम एच २० इ एल ७६७८ वर ड्रायव्हर म्हणून काम करत असुन गंगापुर येथील बालाजी दूध डेरी साठी वैरागड, दिनपाडा, गवळीशिवरा येथुन २८ डिसेंबर रोजी साडेचार वाजेच्या सुमारास बालाजी दुध डेअरी येथुन बोलेरो मैक्स पीकअप मध्ये रिकाम्या दुधाच्या लहान मोठ्या ३२ प्लॅस्टीकच्या कॅनीसह दुध घेण्यासाठी गंगापुर येथुन वैरागड दिनवाडा जात असताना गंगापुर ते देवगाव रंगारी रोडवर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वैरागड येथुन सुमारे १०० लिटर दुध (पाच प्लॅस्टीकच्या कॅनी दुधाने भरलेल्या) शेतक- याकडुन जमा करून व पुन्हा वैरागड शिवरातुन भिगानगर कडे दुध घेण्यासाठी वळहिचा पुलावरुन जात आसताना संतोष प्रभाकर नलावडे रा. मिटमिटा छत्रपती संभाजीनगर यांनी रोडवर थांबुन गाडी अडविले व त्याने पीकअप गाडी मधुन चालकाला बाहेर काढुन धक्काबुक्की करुनशिवीगाळ केली व बालाजी दुध डेरीचे बोलेरो मॅक्स पीअप गाडीची चावी बळजबरीन हिसाकावुन घेवुन गाड़ी चोरून नेली पांढरे रंगाची बोलेरो मैक्स पीकअप ४ लाख रुपये, लहान मोठ्या आकाराच्या भगव्या रंगाच्या प्लॅटीकच्या ३२ कॅनत व त्यात पाच कँनी दुधाने भरलेल्या २० हजार रुपये असा ऐवज संतोष प्रभाकर नलावडे रा. मिटमिटा छत्रपती संभाजीनगर यांने बळजबरिने चोरुन नेल्या प्रकरणी शिल्लेगांव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!