खळबळजनक..छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात गोळीबार, एक जण जागीचं ठार एक जखमी.. गोळ्या झाडतांनाचा व्हिडिओमध्ये थरार…

छत्रपती संभाजीनगरमध्ये भररस्त्यात गोळीबार, एक जण जागीचं ठार एक जखमी.. गोळ्या झाडतांनाचा व्हिडिओमध्ये थरार…

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) बायजीपुरामध्ये भररस्त्यात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एक जण जागीचं ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना पैशांच्या वादातून झाल्याचं सांगितल्या जातंय. फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

संभाजीनगर मध्ये बिहार पॅटर्न
पैशाच्या वादातून बायजीपुरा भागात भर रस्त्यावर गोळीबार हमद चाऊस जागेवर ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला असून आरोपी पसार झाला .हा गोळीबार भर रस्त्यावर झाल्याने सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली होती. एकूण चार राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मागच्या आठवड्यात देखील घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. आजचा गोळीबार हा पैशाच्या वादातून झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी खरे तर एकाला मारण्याचा उद्देश होता. मात्र दुसरा जवळ असल्यामुळे त्यालाही गोळ्या लागल्या. त्यामध्ये तो जखमी झाल्याचे सांगण्यात येत असुन
या गोळीबारातील आरोपी पसार झाला आहे. त्यांचा शोध पोलीस घेत असुन नाकाबंदीही करण्यात आली आहे. पोलिसांचे विशेष पथकही या कामी सक्रिय झाले आहे. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

अलिकडच्या काळात गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. किरकोळ कारणावरुन अनेकदा असे प्रसंग घडत असल्याने पोलिसांच्या पुढील डोकेदुखी वाढली आहे. तसेच लोकांची मानसिकताही हिंसक बनत चालल्याचे दिसून येत आहे
भर रस्त्यावर चार राऊंड फायरिंग; मागच्या आठवड्यात देखील घरात घुसून झाली होती फायरिंग
पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती एकाला मारण्याचा उद्देश मात्र दुसरा जवळ असल्यामुळे जखमी झाला पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!