धक्कादायक,अर्ध्या एकर जमीनीच्या तुकड्यासाठी मुलाने सावत्र आईचा विळ्याने गळा चिरून खून करून केला आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक,अर्ध्या एकर जमीनीच्या तुकड्यासाठी मुलाने सावत्र आईचा विळ्याने गळा चिरून खून करून केला आत्महत्येचा प्रयत्न


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) हिस्स्यापेक्षा अर्धा एकर जमीन मला दे असे म्हणत मुलाने सावत्र आईवर विळ्याने गळ्यावर वार केले या खुनी हल्ल्यात आईचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मुलाने विहीरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु स्थानिक नागरिकांनी त्याला वाचविले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे सावत्र मुलाने आईचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार सकाळी साडेअकरा वाजेच्य सुमारास घडला,आशाबाई घमाजी जाधव वय ४८ वर्षे राहणार अगरसायगाव असे या घटनेतील मयत आईचे नाव असून आरोपी नानासाहेब घमाजी जाधव वय ३३ वर्षे राहणार अगरसायगाव असे खून करणाऱ्या सावत्र मुलाचे नाव आहे.
पोलिसांकडून व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नानासाहेब जाधव यांचा आपल्या सावत्र आई आशाबाई यांनी तिघा भावांना प्रत्येकी दोन एकर जमीन दिली होती परंतु सावत्र मुलगा नानासाहेब याला वाट्यापेक्षा अर्धा एकर जास्त शेत लागत होते अर्धा एकर जमीन सावत्र आई आशाबाई यांनी नकार दिल्याने आईबरोबर वाटणीवरुन वाद घातला होता,या वादातून नानासाहेब याने शनिवार १ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजेचा सुमारास सावत्र आईवर विळ्याने गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले गंभीर दुखापत झाल्याने आशाबाई यांचा जागीच मृत्यू झाला,या घटनेमुळे आरडा ओरडा झाल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी धाऊन आले,त्यांना नानासाहेब याने आपल्या सावत्र आईचा खून केल्याचे बघितले नागरिकांना बघताच नानासाहेब याने शेतातील विहिरीकडे पळ काढत विहिरीत उडी घेत जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी त्याला बाहेर काढत घटनेची माहिती वैजापूर पोलीसांना दिली,घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय लोहकरे,उपनिरीक्षक पाटील, उपनिरीक्षक रज्जाक शेख, पोहेका ज्ञानेश्वर शिंदे,भगवान सिंगल,पवार,गणेश पठारे,आय बाईक पथकाचे जोणवाल, गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. व घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला या प्रकरणी अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहे. आशाबाई जाधव यांच्या पश्चात पती तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!