रेनबो किड्स स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली.

रेनबो किड्स स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली.
नाशिक (प्रतिनिधी) येथील रेनबो किड्स शाळेमध्ये मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.. बाळ गोपाळांनी वारकरी वेश परिधान केला होता तर मुलींनी नऊवारी साडी परिधान केली होती. दिंडी शाळेपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत नेण्यात आली यात मुलांचा तसेच पालकांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. ज्युनिअर केजी मधील अद्वैत नागरे यांनी विठ्ठलाची वेशभूषा परिधान केल्याने तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. रेनबो किड्स मधील विद्यार्थ्यांनी विठू माऊलीच्या विविध गाण्यांवर
नृत्य सादर केले. रेनबो किड्स स्कूलच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापिका जयश्री वाघ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.तसेच कार्यक्रम नियोजन शिक्षिका योगिता , प्राजक्ता नलिनी व इतर शिक्षक कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. या वेळी चांगला पाऊस पडून आमच्या शेतकरी राजाला समृद्धी मिळावी असे साकडे विठू माऊली कडे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!